डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला १०० कोटींचे अनुदान | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला १०० कोटींचे अनुदान

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पीएम उषा योजनेतून १०० कोटी अनुदान मंजूर झाले आहे. बहुविद्या शाखीय शिक्षण आणि संशोधन यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे.

विद्यापीठ प्रशासनाने तत्कालीन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली चार महिन्यांपूर्वी यासाठी प्रस्ताव सादर केला होता. आता केंद्र सरकारने पीएम उषा अंतर्गत अनुदान मंजूर विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासोबतच महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि गडचिरोली येथील विद्यापीठाचा प्रस्ताव ही मंजूर झाला आहे. त्यामुळे या तीनही विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटींचे अनुदान मिळणार आहे. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी हे अनुदान मंजूर झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा : 

Back to top button