पुण्यातील भिडे पूल परिसरात दोन महिने वाहतूक बदल

पुण्यातील भिडे पूल परिसरात दोन महिने वाहतूक बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून डेक्कन जिमखाना भागातील पीएमपी स्थानक ते भिडे पूलदरम्यान पावसाळी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढील दोन महिने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरून डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पुलादरम्यान पावसाळी पाईपलाईन टाकण्याचे काम सोमवारपासून (दि. 16) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरून डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले.

केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणार्‍या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन मगर यांनी केले आहे. केळकर रस्त्यावरून जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे, तसेच जंगली महाराज रस्त्यावरून केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणार्‍या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा. भिडे पूल, सुकांता हॉटेल, खाऊगल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news