मोठया कुटुंबासाठी स्वस्तातील कार, पाच लाखात मिळतात या गाड्या

7 seater cars
7 seater cars

पुणे : पुढारी वृत्तसेवा

तुम्हाला नवीन कार घ्यायची आहे, परंतु कुटुंब मोठे आहे आणि बजेट कमी आहे, अशा परिस्थितीत तुम्ही ७ सीटर बजेट कारचा विचार करायला हरकत नाही. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये मोठी कार खरेदी करायची असेल तर बाजारात बरेच पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ७ सीटर कारंबद्दल सांगणार आहोत, ज्या स्वस्त आणि दमदार आहेत. या कार्सच्या किंमती ५ लाखांच्या आसपास आहेत.

डॅट्सन गो प्लस

डॅटसन गो प्लस ही देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.20 लाख रुपये इतकी आहे. म्हणजेच मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबासाठी ही कार बेस्ट आहे. या कारचा लुकदेखील चांगला आहे. डॅटसन गो प्लसमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर SOHC पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5000 आरपीएम वर 67 हॉर्सपॉवर आणि 4000 आरपीएमवर 104 एनएम टॉर्क निर्माण करते.

मारुती सुझुकी इको

मारुती कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीच्या 7 सीटर इकोला (Eeco) देशभरात मोठी मागणी आहे. मारुती सुझुकी इकोची किंमत 3,97,800 रुपये (दिल्ली एक्स शोरूम) इतकी आहे. इकोमध्ये 1196 सीसी 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 6000 आरपीएम वर 72.41 एचपीची शक्ती आणि 3000 आरपीएम वर 101 एनएम टॉर्क जनरेट करतं. मारुती सुझुकी इको पेट्रोल व्हेरिएंट 16.11 किमी प्रतिलिटर मायलेज देऊ शकतं, तसेच मारुती सुझुकी इको सीएनजीमध्ये 21.94 किमी प्रति किलो मायलेज देते.

रेनॉ ट्रायबर

स्वस्त आणि स्टायलिश 7 सीटर कार्सच्या यादीत रेनॉ ट्रायबर ही तिसरी कार आहे. 7 सीटर रेनॉ ट्रायबरची किंमत 5.20 लाख रुपये इतकी आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,50,000 रुपये इतकी आहे. मध्यम वर्गीय कुटुंबांसाठी ही एक उत्तम कार आहे. या कारचा लुक एखाद्या प्रीमियम कारसारखा आहे. Renault Triber मध्ये 999cc चं 3 सिलेंडर इंजिन आहे, जे 6250 आरपीएम वर 71 एचपीची शक्ती आणि 3500 आरपीएम वर 96 एनएम टॉर्क उत्पन्न करतं. या कारच्या फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास ट्रायबरमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, दुसर्‍या आणि तिसर्‍या रो सीटसाठी एसी व्हेंट आणि सुरक्षिततेसाठी एअर बॅग्स आहेत.

https://youtu.be/fw-3g-eGj0Y

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news