पुणे : अस्तित्व टिकविण्यासाठी मातब्बर पक्षबदलाच्या मार्गावर

पुणे : अस्तित्व टिकविण्यासाठी मातब्बर पक्षबदलाच्या मार्गावर
Published on
Updated on

वैभव धाडवे पाटील

सारोळा : आरक्षण काय लागणार, यावर निर्णय झालेला नसतानाही व वॉर्डरचनेतील फेरबदलाबाबत अद्याप ठोस माहिती नसतानाही अनेकांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तुतारी वाजविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या पक्षातील स्वत:ची प्रतिमा ढासळल्याची भीती अनेकांना आहे. त्यामुळे राजकारणात टिकून राहण्यासाठी व सत्तेशिवाय शहाणपण नसल्यामुळे आता पक्षबदलासाठी अनेक दिग्गज नेते चाचपणी करीत आहेत.

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या 3 जागांमध्ये एकने वाढ होऊन त्या आता 4 होणार आहेत. सन 2012 मध्ये असणार्‍या जुन्या 4 जागा तशाच ठेवणार असले, तरी काही गावांमध्ये मात्र घडाळाच्या काट्यानुसार वॉर्डरचना होणार असल्याची चर्चा आहे. काही गावांची अदलाबदल केल्याच्या चर्चेमुळे ग्रामस्थांमधून हरकती घेण्याची तयारी झाली आहे.

तिकीट कुणाला मिळणार याचीच चर्चा

नसरापूर वेळू गटात पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार, तर कोण दिग्गज नेते पक्ष बदल अथवा अपक्ष लढणार, हे आता वेळेवरच ठरणार आहे. मात्र, याबाबतची चर्चा जोरदार सुरू आहे. अनेक दिग्ग्ज नेते आपला पक्ष सोडून जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून तिकीट मिळणार असेल तर पक्षही सोडणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

मोहरी बुद्रुक, हातवे बुद्रुक, हातवे खुर्द आणि ताबांड ही गावे नसरापूर-वेळू गटात जात आहेत, तर नसरापूर-वेळू गटातील कामथडी, करंदी, उंबरे आणि खडकी ही गावे भोंगवली-संगमनेर गटात जाणार असल्याची चर्चा नेत्यांमध्ये आहे. विनाकारण गावांची अदलाबदल केल्यास ग्रामस्थाकडूंन हरकती व ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. नसरापूर गणामध्ये मोहरी बुद्रुक, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, तांबाड, दिडघर, विरवाडी, सोनवडी, जांभळी, सांगावी निधान, पारवडी, कुरंगवडी, सांगवी, माळेगाव, नसरापूर, कांबरे, दिगाव, नायगाव, केळावडे अशा 18 गावांमध्ये जवळपास 20 हजार मतदार आहेत, तर वेळू गणामध्ये शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी, खोपी, कुसगाव, रांजे, शिवरे, वर्वे बुद्रुक, वर्वे खुर्द, कांजळे, साळवडे या 12 गावामध्ये 22 हजारांच्या आसपास मतदार आहेत.

इच्छुकांचा मतदारांशी संपर्क सुरू

नसरापूर वेळू गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नियोजन समिती सदस्य विक्रम खुटवड, भोर पंचायत समिती सभापती लहूनाना शेलार, मागील निवडणुकीत अपक्ष लढलेले चंदुभैया परदेशी, डॉ. राजेंद्र डिंबळे, उद्योजक धनेश डिंबळे, शिवाजी वाडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वर पांगारे, माजी सरपंच माऊली भोरडे, नीलेश भोरडे, उद्योजक विशाल कोंडे, ज्ञानेश्वर झोरे, मदन खुटवड, अशोक वाडकर, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, माजी उपसभापती अमोल पांगारे, भोर शिवसेना अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, अदित्य बोरगे, भाजपाचे जीवन कोंडे मतदारांच्या संपर्कात आहेत.

कोंडे बालेकिल्ला टिकवणार का?

भोर तालुक्यातील नसरापूर वेळू गट वॉर्ड क्रमांक 1 म्हणून सन 2012 मध्ये पाहिला जायचा. तब्बल दोन माजी सदस्य कुलदीप कोंडे व पत्नी विद्यमान सदस्य शलाका कोंडे यांनी शिवसेनेचा झेंडा फडकत ठेवला. या वेळी कोंडे बाल्लेकिल्ला टिकवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news