थरारपट! पुणे रेल्वे स्थानकाच्या धोकादायक पादचारी पूलावर मनोरुग्ण चढला

थरारपट! पुणे रेल्वे स्थानकाच्या धोकादायक पादचारी पूलावर मनोरुग्ण चढला
Published on
Updated on

पुणे : पुढारी :  पुणे रेल्वे स्थानकाच्या एफओबीवर (फुट ओव्हर ब्रिज, पादचारी पूल) मनोरुग्ण चढला आहे, त्याला खाली उतरवण्याची कार्यवाही सुरू असून रेल्वे गाड्यांसाठी असलेल्या विद्युत तारांमुळे आणि खाली पडून अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. मागील काही महिन्यांपूर्वी असाच एक मनोरुग्ण एका रेल्वे गाडीवर चढला होता त्यावेळी विद्युत तारांचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा मनोरुग्णांना रोखण्यासाठी रेल्वे कडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.

ही घटना नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलावर घडलेली आहे. या पुलाला लागूनच मेट्रोचे नवीन स्थानक आहे. त्यातून अथवा रेल्वेच्याच परिसरातून हा व्यक्ती वरती चढल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस अधिकारी म्हणाले, सदरील व्यक्तीला आमच्या कर्मचाऱ्यांकडून खाली उतरवण्यात आले असून, त्याची सखोल विचारपूस करण्यात येत आहे. या व्यक्तीकडून खाली उतरण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्याची चौकशी सुरू आहे मात्र सदरील व्यक्ती उडवा उडवीची उत्तर देत आहे.

पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे व्हाट्सअप ग्रुप वरून अशी माहिती मिळाली की एक मनोरुग्ण इसम छत्री गेटवरील पत्र्यांवरती चढलेला आहे. डी बी टीमने शर्तीचे प्रयत्न करून ब्रिजवरील पत्र्यावर चढून खाली उतरवून घेतले असून त्याच त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव संजय कुमार दरोगी शर्मा वय 28- वर्षे धंदा-सेंटरिंग राहणार – मुखिया कटियाल बिहार असे सांगितले त्यास पत्र वरती जाण्याचे कारण विचारले असता तो काही एक व्यवस्थित उत्तर देत नाही. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 1051 सुनिल कदम पोलीस हवालदार 1122 आनंद कांबळे पो. हवा. 945 अनिल टेके पो. नाईक 57 निलेश बिडकर पोलीस शिपाई 202 विकम मधे पोलीस शिपाई 115 नेमाजी केंद्रे या टीमने केले आहे

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news