त्या तहसीलदारांनी अधिकार नसताना दिले नोंदीचे आदेश; पुणे विभागातील प्रकार

त्या तहसीलदारांनी अधिकार नसताना दिले नोंदीचे आदेश; पुणे विभागातील प्रकार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने सातबारा उतार्‍यामधील हस्तलिखित चुका दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 नुसार अधिकार दिले आहेत. मात्र, काही तहसीलदारांनी अधिकार नसताना नवीन शर्तीचे शेरे, कुळकायद्यानुसार दाखल करण्यात आलेले शेरे, वारसांच्या नोंदी आदी नोंदींचे आदेश जारी केल्याचे दिसून आले आहे.
पुणे विभागात गेल्या दहा वर्षांत कलम 155 नुसार 50 हजार 432 आदेश जारी केले आहेत.

यामध्ये हस्तलिखित दुरुस्ती दिलेल्या आदेशांची संख्या 46 हजार 577 आहे. तर अधिकार नसतानाही तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशांची संख्या 2 हजार 51 इतकी आहेत. काही तहसीलदारांनी शेरे कमी केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्या होत्या. त्यानुसार शासनाने विभागीय आयुक्तांना तपासणीचे आदेश दिले होते. या तपासणीत ही बाब आढळून आली आहे. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत लेखन प्रमादाव्यतिरिक्त दिलेल्या आदेशांची संख्या 2 हजार 51 एवढी आहे.आहे.

यामध्ये नवीन शर्तीचे शेरे कमी केलेले आदेश 113, कुळकायद्यानुसार दिलेल्या आदेशांची संख्या 90, आकारीपड बाबतचे आदेश 12, वारसाच्या नोंदींबाबतचे आदेशांची संख्या 292, वारसांच्या नोंदीचे आदेश 292, खरेदी-विक्री व्यवहारासंदर्भात दिलेले आदेश 291, इतर हक्कातील पोकळीस्थ शेरेबाबतचे 497 आदेश, इतर हक्कातील बोजे कमी केलेल्या आदेशांची संख्या 69 तर कोणत्याही कायद्यानुसार दाखल असलेले शेरे कमी केलेल्या आदेशांची संख्या 407 इतकी आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news