Weather Update : मराठवाडा, विदर्भावर अवकाळी पाऊसाचे सावट | पुढारी

Weather Update : मराठवाडा, विदर्भावर अवकाळी पाऊसाचे सावट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असून, कमाल तापमानात वाढ होणार आहे. राज्यातील थंडी गायब झाली असून, आता मात्र कमाल आणि किमान तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली आहे. उत्तर भारताकडून राज्याकडे येणार्‍या थंड वार्‍यांचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. दरम्यान, विदर्भात चक्रीय स्थिती तयार झाली आहे.

याबरोबरच कमी दाबाचा पट्टा विदर्भ ते उत्तर कर्नाटक तेलंगणा पार करून गेला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भ, मराठवाडा भागात 13 फेब्रुवारीपर्यंत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात हवामान कोरडे राहणार आहे. असे असले तरी थंडी गायब झाली असली, तरी किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे.

अनेक राज्यांत पावसाची शक्यता

उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुके कायम आहे. येत्या पाच दिवसांत यामध्ये काहीच बदल होणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा

 

Back to top button