विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप सेल

विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये इंटर्नशिप सेल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यातील विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये इंटर्नशीप सेल स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये समन्वयक अधिकार्‍यासह चार सदस्यांची समिती नेमावी लागणार आहे. विद्यार्थी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून या कक्षाला काम करावे लागणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वर्गात अनुभवता न येणार्‍या औद्योगिक वातावरणाची ओळख करून देणे, उद्योगांसाठी आवश्यक विश्लेषणात्मक, व्यवस्थापकीय कौशल्ये प्राप्त करण्याची संधी देणे, प्रत्यक्ष अनुभवातून व्यावसायिक, संप्रेषण, व्यावसायिक नैतिकता अशी कौशल्ये शिकण्याची संधी देणे, रोजगार किंवा संशोधनामध्ये संधी उपलब्ध करणे, हा इंटर्नशिपचा उद्देश आहे. त्यासाठी सत्रनिहाय आठ ते बारा श्रेयांक निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महाविद्यालयात इंटर्नशिप कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या निर्णयानुसार विद्यापीठे, महाविद्यालयांनी त्यांच्या परिक्षेत्रातील उद्योग, व्यावसायिक आस्थापना, वित्तीय संस्था, बँक, अशासकीय संस्था यांच्यांशी समन्वय साधण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इंटर्नशीप कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. या कक्षात समन्वयक अधिकारी, सहायक समन्वयक, विद्याशाखानिहाय समन्वयक, विद्यार्थी समन्वयक यांचा समावेश असेल. समन्वयक अधिकारी शैक्षणिक वर्षातील कार्यप्रशिक्षणाची प्रगती, तपशील कुलगुरू, प्राचार्यांना सादर करतील.

या कक्षाने दरवर्षी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या पसंतीच्या संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, उद्योगांशी दीर्घकालीन सहकार्यासाठी सामंजस्य करार करणे, विषयतज्ज्ञ, उद्योग, संघटना, मार्गदर्शक, प्राध्यापक सदस्यांची नोंदणी करण्यासाठी आणि ती माहिती विद्यार्थ्यांना पाहता येण्यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करावी, इंटर्नशिप पूर्वतयारीचे वर्षभर कार्यक्रम करावे, राष्ट्रीय उच्च शिक्षण आराखड्यानुसार विद्यार्थ्यांच्या कार्यप्रशिक्षणाचे मूल्यमापन, एकसमान नोंद याबाबत कक्ष काम करेल, असे नमूद केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news