Fake Gutkha
Fake GutkhaPudhari

Theur Phata Fake Gutkha Factory Raid: थेऊर फाट्यावर बनावट गुटख्याचा कारखाना उध्वस्त; तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर पोलिस व अमली पदार्थविरोधी पथकाची पहाटेची धडक; चार जण ताब्यात, गोडाउनमालक पसार—बनावट गुटख्याचे मोठे जाळे उघड
Published on

लोणी काळभोर: लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरातील थेऊर फाटा येथील गोडाउनमध्ये बनावट गुटखा व सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून अमली पदार्थविरोधी पथक 2 व लोणी काळभोर पोलिसांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गोडाउनमालक पसार झाला आहे. हा कारवाई गुरुवारी (दि. 4) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

Fake Gutkha
Baramati Road Condition: बारामतीत रस्त्यांची दुरवस्था; अर्धवट कामांमुळे नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

कारखाना चालवणारा रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय 25, रा. काळुबाई मंदिराजवळ, पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली), साथीदार रामप्रसाद ऊर्फ बापू प्रजापती (वय 50, रा. थेऊर, ता. हवेली, मूळ उत्तर प्रदेश), अप्पू सोनकर (वय 46, रा. कांबळेवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली), दानिश खान (वय 18, रा. कांबळेवस्ती, थेऊर फाटा, ता. हवेली) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. यांपैकी गुप्ताला अटक करण्यात आली आहे, तर गोडाऊनचा मालक सुमीत गुप्ता पसार झाला आहे.

Fake Gutkha
Baramati Municipality Election: बारामतीसह 5 पालिकांत 20 डिसेंबरला मतदान; हायकोर्टाने याचिका फेटाळली

वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्यासह पोलिस कर्मचारी राजस शेख, संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदीप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांच्या पथकास थेऊर फाटा परिसरात सुमीत गुप्ताच्या गोडाउनमध्ये बनावट गुटखा बनवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने लोणी काळभोर पोलिसांच्या सहकार्याने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

Fake Gutkha
Narayangaon Leopard Attack Youth Injured: नारायणगावात भीषण बिबट्या हल्ला! युवक थोडक्यात बचावला

या वेळी गुटखा वाहतूक करण्यासाठी मॉडिफाय केलेली 50 लाखांची 3 वाहने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड, बनावट गुटखा, सुगंधित तंबाखू, पान मसाला तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रसायन, थंडक, गुलाबपाणी, सुपारी, पाकिटे, बॉक्स, पोती आदी साहित्य मिळून आले.

Fake Gutkha
Hinganiberdi Leopard Capture: हिंगणीबेर्डीत अखेर बिबट्या जेरबंद; आठ दिवसांच्या मोहिमेला यश!

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहायक पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईतून परिसरातील बनावट गुटखा रॅकेटचे मोठे जाळे उघडकीस आले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news