तलाठी परीक्षेत घोटाळा नाही; वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा

तलाठी परीक्षेत घोटाळा नाही; वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे वृत्त हेतुपुरस्सर पसरविले जात असून, यात कोणताही घोटाळा झालेला नाही. गुणवत्ता यादी नियमानुसारच लावली आहे, असा दावा या प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 8) केला. तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सष्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यांत 57 सत्रांमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत तलाठीपदासाठी राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थिंनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली.

परीक्षेत विचारलेल्या प्रश्न आणि उत्तरांबाबत उमेदवारांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या, त्याचे शंकांचे समाधान टी.सी.एस. कंपनीने तीनवेळा केले. यात एकूण 149 प्रश्न होते. ज्यांचे शंकासमाधान 4 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात आले. त्यानंतर टी.सी.एस. कंपनीने जाहिरातीमध्ये प्रसिध्द केल्यानुसार 57 प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी विचारात घेऊन उमेदवारांनी दिलेल्या उत्तरांच्या गुणांवर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. यात वापरली गेलेली गुण सामान्यीकरण पध्दती 27 सष्टेंबर 2023 रोजी भूमिअभिलेखच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. 5 जानेवारी 2024 रोजी सामान्यीकरण पध्दतीने केलेल्या गुणांनुसार यादी 'तलाठी भरती टॅब'वर प्रसिध्द केली आहे.

या भरती परीक्षेमध्ये 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. तलाठी भरतीची निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल. ज्यामुळे परीक्षार्थींच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.

भरती परीक्षेत घोटाळ्याची चौकशी करावी : रोहन सुरवसे

तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला दोनशेपैकी दोनशेचौदा गुण मिळाले असून, आजवरच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. तलाठी भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला झाला असून, याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली. सुरवसे म्हणाले, "स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या टि्वटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले आहेत, तर तलाठी भरती परीक्षेत दोनशेपैकी दोनशेचौदा गुण मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणार्‍या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे. से-पाटील यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news