पुणे : चौकीतच उपनिरीक्षकांना कॉलर पकडून मारहाण

पुणे : चौकीतच उपनिरीक्षकांना कॉलर पकडून मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  भांडणाच्या कारणावरून कात्रज पोलिस चौकीत आलेल्या दोघांनी 'तुझी वर्दी उतरवतो,' असा दम देऊन पोलिस उपनिरीक्षकाची कॉलर पकडून त्यांना मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी प्रीतम चुन्नीलाल परदेशी व त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी (दोघे रा. कात्रज गाव) यांना अटक केली आहे. हा प्रकार कात्रज पोलिस चौकीत सोमवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता घडला.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक नितीन तानाजी जाधव (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पांडुरंग माळवे (वय 23, रा. कात्रज) याच्याबरोबर आरोपींची भांडणे झाली होती. त्याची एनसी दाखल केली गेली होती. या कारणावरून आरोपी कात्रज चौकीत आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले. तेव्हा रात्रपाळी अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी त्यांना 'आरडाओरडा करू नका' असे सांगितले. त्याचा राग मनात धरून प्रीतम परदेशी याने फिर्यादी यांना 'तुला आम्ही कोण आहे? ते दाखवतो, तुझी वर्दी उतरवतो. माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तू या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ,' अशी धमकी देऊन फिर्यादी यांना जोराने ढकलून दिले.

त्याची आई सुजाता हिने त्यांची शासकीय गणवेशाची कॉलर पकडून 'तुझ्यासारखे बरेच बघितलेत, तू काय करणार आमचे? मुलगा प्रेसमध्ये आहे, तुझी नोकरी घालवते,' असे म्हणून शिवीगाळ केली. प्रीतमने त्याच्याकडील मोबाईलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करून त्यांना जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news