व्हिडीओ पॉडकास्टच्या क्षेत्रात तरुणाईचा डंका

व्हिडीओ पॉडकास्टच्या क्षेत्रात तरुणाईचा डंका
Published on
Updated on
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऑडिओ पॉडकास्टची दुनिया तशी तरुणांसाठी नवीन नाही…पण, आता ऑडिओ पॉडकास्टसह व्हिडिओ पॉडकास्टच्या क्षेत्रात तरुणाई नवी ओळख मिळवत असून, तरुणाईचा व्हिडिओ पॉडकास्टच्या क्षेत्रात डंका वाजत आहे. स्त्री – पुरुष समानता, लैगिंकता, व्यसनाधीनता, मासिक पाळी अशा ज्वलंत विषयांवर पॉडकास्टद्वारे तरुणाई मोकळेपणाने बोलत असून, तरुणच तरुणांमधील विषयच पॉडकास्टमधून मांडत आहेत. 20 ते 35 वयोगटातील तरुणाई पॉडकास्ट बनवत आहे.
विशेष म्हणजे शहरातील नव्हे तर ग्रामीण भागातील तरुणही या क्षेत्रात नाव कमावत असून, व्हिडिओ पॉडकास्टचे क्षेत्र तरुणांसाठी व्यक्त होण्याचे हक्काचे माध्यम बनले आहे. अगदी प्रादेशिक भाषांमध्येही पॉडकास्ट तयार केले जात आहेत. शुक्रवारी साजरा होणार्‍या स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त दै. पुढारी घेतलेला हा आढावा. संघर्षातून यशाकडे झेप घेणार्‍या तरुणांची वाटचाल, व्यसनमुक्तीचा प्रवास, करिअरमधील झेप, गावकडचे जगणे, डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतरचा प्रवास…असे वैविध्यपूर्ण विषय पॉडकास्टमधून मांडले जात आहेत. ऑडिओ पॉडकास्टचा ट्रेंड सुरु आहेच.
पण, आता व्हिडिओ पॉडकास्ट तयार करणार्‍या तरुणाईचा सगळीकडे बोलबाला आहे. व्हिडिओ स्वरूपातही पॉडकास्ट रेकॉर्ड करून ते यु-ट्यूबसह विविध अ‍ॅपवर अपलोड केले जात आहेत. संवाद, बॅकग्राऊंड संगीत अन् विशिष्ट शैलीतील सादरीकरण…अशा विविध गोष्टींचा वापर करून व्हिडिओ रेकॉर्ड केले जात आहेत, त्यानंतर एडिटिंग करून त्याला पॉडकास्टचे रूप दिले जात आहे आणि ते अ‍ॅपवर अपलोड केले जात आहेत.
नोकरी सांभाळून व्हिडिओ पॉडकास्टच्या जगात कार्यरत असलेले लक्ष्मीकांत सुतार म्हणाले, सध्या व्हिडिओ पॉडकास्ट हे माध्यम ट्रेडिंग आहे. मनोरंजनासह एखाद्या विषयाची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी मी पॉडकास्ट बनवू लागलो  आणि दैनंदिन जीवनातील विषयांसह सामाजिक विषयांवर मी पॉडकास्ट तयार केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद  मिळत आहे.  स्त्री –  पुरुष समानतेपासून ते राजकारणापर्यंतचे विषय आम्ही हाताळले आहे. एखादा ज्वलंत विषय घेऊन आम्ही त्यातील तज्ज्ञाला बोलावून त्यावर चर्चा करतो. पॉडकास्टसाठी मी आणि माझी टीम काम करतो. व्हिडिओ शूट करण्यापासून ते एटिडिंगची जबाबदारी तरुणच सांभाळत आहेत.
व्हिडीओ पॉडकास्टच्या क्षेत्रात आज अनेक तरुण कार्यरत आहेत. आम्हीही नाट्य क्षेत्राशी संबंधित पॉडकास्ट तयार करत आहोत. अनेक दिग्गज कलाकारांशी मोकळेपणाने चर्चा करता येत असून,  कलाकारांशी असलेला हा संवाद पॉडकास्टमुळे जगभरात पोचत आहेत. या क्षेत्रात फक्त कला आणि सांस्कृतिकच नव्हे आज तरुण राजकारणापासून ते सामाजिक विषयांपर्यंत दिलखुलासपणे बोलत  आहेत.
– राहुल लामखडे, पॉडकॉस्ट दिग्दर्शक 

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news