खबरदार ! रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे विद्यापीठाचे निर्देश | पुढारी

खबरदार ! रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे विद्यापीठाचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयांमध्ये रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून त्याचा प्रथम तसेच व्दितीय सत्राचा अहवाल द्यावा, असे स्पष्ट निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम 1999 लागू केला आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या अधिनियम, तरतुदी महाविद्यालयांच्या माहितीसाठी व अंमलबजावणीसाठी यापूर्वीच कळविण्यात आल्या आहेत.

त्यामुळे भविष्यात रॅगिंगच्या घटना घडू नयेत, यासाठी व्यापक स्वरूपात काटेकोरपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी, मान्यताप्राप्त संस्थेतील तसेच पदव्युत्तर विभागांनी प्रवेशित विद्यार्थ्यांना संबंधित अधिनियमांची माहिती करून विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंगचे प्रकार प्रतिबंधित करण्याच्या दृष्टीने व्यापक जागृती करावी. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियमांचे तंतोतंत व काटेकोर पालन करणे महाविद्यालय/संस्था/पदव्युत्तर विभागांवर बंधनकारक आहे.

हेही वाचा

Back to top button