पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंधरा दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांप्रमाणे आता महापालिका प्रशासनाचीही लगबग सुरू झाली आहे. नैसर्गिक जलप्रवाहात मूर्तिविसर्जनावर बंदी असल्याने आणि यंदा फिरते हौद नसल्याने मूर्तिसंकलन केंद्र व विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवासाठी स्वच्छता, मूर्तिविसर्जन व्यवस्था, निर्माल्य संकलन, प्रकाश व्यवस्था अशा विविध पातळ्यांवर व्यवस्था केल्या जातात.
कोविडकाळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने विसर्जन हौदांना फाटा देऊन फिरते विसर्जन हौद ठेवले होते. यंदा फिरते विसर्जन हौद नसतील. त्यामुळे गणेश मूर्तिविसर्जनासाठी संकलन केंद्रे आणि विसर्जन हौदांची संख्या वाढविण्यात येणार आहे. पालिकेकडून विविध भागांत सुमारे 455 कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे.
मूर्तिविसर्जन टाक्या
धनकवडी-सहकारनगर 77
वारजे-कर्वेनगर 71
कोथरूड-बावधन 67
कोंढवा-येवलेवाडी 58
कसबा-विश्रामबाग 57
बिबवेवाडी 54
निर्माल्यसंकलन कंटेनर
हडपसर-मुंढवा 36
सिंहगड रोड 34
वारजे-कर्वेनगर 24
धनकवडी-सहकारनगर 20
कोथरूड-बावधन 19
बिबवेवाडी 19
कसबा-विश्रामबाग 15
औंध-बाणेर 14
येरवडा-कळस-धानोरी 14
ढोले पाटील रस्ता 13
कोंढवा-येवलेवाडी 13
शिवाजीनगर-घोले रस्ता 12
मूर्तिसंकलन केंद्र
कसबा-विश्रामबागवाडा 39
हडपसर-मुंढवा 36
सिंहगड रस्ता 25
कोथरूड-बावधन 19
धनकवडी सहकारनगर 19
औंध-बाणेर 17
शिवाजीनगर-घोले रस्ता 16
हेही वाचा