शहराच्या नियोजनासोबतच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी महापालिकेच्या वतीने 'इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर' (आयसीसीसी) सेल स्थापन करण्यात येणार आहे. या सेलच्या प्रमुखपदी उपायुक्त प्रतिभा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून महापालिकेच्या सर्व विभागांसह पीएमपीएमएल, पोलिस आणि स्मार्ट सिटी कंपनीमध्ये समन्वय राखून कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या पथ विभागासह मलनिस्सारण देखभाल व दुरूस्ती विभाग, विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा, सुरक्षा, वृक्ष व उद्यान विभाग, आरोग्य विभाग आणि घन कचरा विभागाच्या वतीने शहरात नवीन विकासकामे व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात..