पालिका आरोग्य विभागाची 46 सोनोग्राफी केंद्रांवर धडक कारवाई | पुढारी

पालिका आरोग्य विभागाची 46 सोनोग्राफी केंद्रांवर धडक कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील 46 सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई केली आहे. अर्धवट भरलेली कागदपत्रे, अद्ययावत
माहिती दिली नाही. काही केंद्रांना 24 तास, तीन दिवस, तर काहींना आठ दिवस केंद्र बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली.
सोनोग्राफी केंद्रांना एप्रिलमध्ये कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला होता, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
 सोनोग्राफी केल्यानंतर त्याचे अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देणे बंधनकारक आहे. त्यात चालढकल केल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ए’ फॉर्मवर स्वाक्षरी नाही, डॉक्टरांची स्वाक्षरी नाही, अशा तीन केंद्रांना तीन दिवस बंद ठेवण्याची शिक्षा दिली. तर हीच गोष्ट जास्त रुग्णांबाबत आणि अर्जांबाबत केल्यामुळे तीन सेंटर्सना आठ दिवस बंद ठेवण्यात आले. यापुढेही केंद्र चालकांवर लक्ष ठेवले जाईल,’ असे महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
हेही वाचा:

Back to top button