ज्वारीला उच्चांकी 5 हजार 301 रुपये दर

ज्वारीला उच्चांकी 5 हजार 301 रुपये दर
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (दि. 30) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 5 हजार 301 रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप यांनी दिली.

सासवड येथील उपबाजारात सोनोरी, दिवे, गराडे परिसरासह संपूर्ण पुरंदर, दौंड, बारामती अशा विविध भागांतून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते. बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5 हजार 301 हजार रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 3 हजार 500 हजार रुपये, तर सरासरी 4 हजार 40 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news