That is why Gajanan Chinchwade died
That is why Gajanan Chinchwade died

त्यामुळेच गजानन चिंचवडे यांचा मृत्यू

नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचा गंभीर आरोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केल्यामुळेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांच्या पत्नी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. ५) रात्री नऊ जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शकुंतला बाळू चिंचवडे, दिनेश बाळू चिंचवडे, राजेश बाळू चिंचवडे, महेश उर्फ सुनील बाळू चिंचवडे, ओमकार महेश चिंचवडे, संकेत दिनेश चिंचवडे, वंदना दिनेश चिंचवडे, पुनम महेश चिंचवडे आणि राजेश चिंचवडे यांच्या पत्नी (सर्व रा. चिंचवडेनगर चिंचवड गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे (४५ रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचे पती गजानन चिंचवडे यांच्याविरोधात २५ जानेवारी २०२२ रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला.

तसेच, प्रसिद्धी माध्यमांमध्ये खोटी माहिती देऊन बदनामी करीत त्यांना मानसिक त्रास दिला. त्यामुळे गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, गजानन चिंचवडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्या केल्याची देखील चर्चा होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

त्यानंतर डॉक्टरांनी देखील व्हिसेरा राखून ठेवत नेमके कारण न दिल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.

https://youtu.be/finX7obEqMI

logo
Pudhari News
pudhari.news