लोणावळा : ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू

लोणावळा : ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू

लोणावळा : राजमाची किल्ल्या लगतच्या ढाक बहिरीच्या सुळक्यावरुन पडून एका ट्रेकर्सचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी दुपारी घडली. प्रतिक आवळे (रा. औरंगाबाद) असे या ट्रेकर्सचे नाव आहे.

ढाक बहिरी हा कर्जत व मावळ तालुक्याच्या मध्यावर असलेला उंच सुळका आहे. अनेक जण याठिकाणी ट्रेकिंगसाठी जात असतात. शनिवारी सकाळी प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने, अभिषेक शेजुळ आणि सागर जैस्वाल हे 5 जण औरंगाबादहून ट्रेक साठी गेले होते. त्यातील प्रतीक आवळे याचा तोल गेल्याने तो खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शनिवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी त्याठिकाणी ट्रेकिंगसाठी आलेल्या तुषार महाडिक व भारत रायकर या दोघांनी ही घटना बघितली. त्यांनी मृत प्रतीक आवळे व इतर चार जणांना व्यवस्थित जागेवर घेतले. या घटनेची माहिती समजताच संतोष दगडे व त्यांची टीम कर्जत तसेच स्थानिक गावकरी लगेच ढाक बहिरी जवळ पोहोचले तसेच यशवंती हायकर्स खोपोली ची टीम साहित्यासह ढाक च्या डोंगरावर पोहोचली.

सायंकाळी 6.30 वाजल्यापासून मृत प्रतीक व त्याचे सहकारी यांना कर्जत मधील सांडशी गावाच्या वाटेने खाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. या मदतकार्यावेळी काळोख असल्याने तसेच पायवाट, डोंगर उतार व कड्याच्या बाजूची अरुंद जागा यातून सर्व ट्रेकर्स टीम व गावकरी यांनी प्रतीकचा मृतदेह व इतर चौघांना पहाटे 3.30 वाजता खाली सांडशी गावात आणले आणि त्यानंतर कर्जतला पाठवण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news