स्वर साधनेसह अभिनयही केला होता लतादीदींनी ! ‘ते’ चित्रपट माहीत आहेत का ?

lata mangeshkar
lata mangeshkar

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या जादूई आवाजाने सर्वांच्या मनावर रूंजी घालणार्‍या भारताची गानकोकिळा,  गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (lataDidi) कालवश. वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. एक जादूई आवाज काळाच्या पडद्याआड गेला. ज्यांच्या आवाजाने सर्वांना भूरळ घालणाऱ्या गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (lataDidi) यांचा थोडक्यात जीवनपट जाणून घेवूया. ((१९२९-२०२२))

एक सूर्य, एक चंद्र, एकच लता
एक सूर्य, एक चंद्र, एकच लता

हेमा-लता (lataDidi)

पं दीनानाथ व शेवंता या दाम्पत्त्याला  इंदौर येथे जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी  एक कन्यारत्न झाले; त्याच या  लता मंगेशकर. लतादीदींच लहानपणीच नाव हेमा होतं, पण वडील पं दीनानाथ हे एका नाटकातील लतिका पात्राला प्रभावित झाले होते.  या नंतर ते हेमाला लता म्हणू लागले. आणि हेच नाव पुढे रूढ झाले. लतादीदींना गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांचे वडील पं दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक आणि नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर पं दीनानाथ मंगेशकर आणि शेवंता मंगेशकर यांच पहिल अपत्य. त्यांना आशा, मीना, उषा, ह्रदयनाथ ही चार भावंडे.

लतादीदींचा लहानपणीचा एक फोटो.
लतादीदींचा लहानपणीचा एक फोटो.

गायनाबरेबरचं अभिनयही केला

लतादीदींच (lataDidi) मराठी चित्रपटातील पहिलं मराठी गाणं म्हणजे १९४२ साली गायलेले  'किती हसाल' या चित्रपटासाठी  नाचू या ना गडे खेळू सारी… मनी हौस भारी '' हे होते. मात्र या गाण्याचा समावेश काही कारणास्तव या चित्रपटात करण्यात आला नाही. त्यामूळे १९४२ मध्ये मंगळागौर या  चित्रपटातील गायलेले 'नटली चैत्राची  नवलाई…' हे गाणे त्यांच पहिले ठरले. या चित्रपटात त्यांनी छोटीसी भूमिकाही केली होती. त्याचबरोबर लतादीदींनी पहिली मंगळागौर, बडी मॉं, चिमुकला संसार, गजाभाऊ, जीवनयात्रा, मंदिर, छत्रपती शिवाजी, चिमकुला संसार या चित्रपटांत भूमिकाही साकारल्या आहेत.

नाचू या ना गडे खेळू सारी… मनी हौस भारी ''
नाचू या ना गडे खेळू सारी… मनी हौस भारी ''

आनंदघन (lataDidi)

आनंदघन
आनंदघन

लतादीदीं गायन, अभिनयाबरोबरचं काही चित्रपटांना संगीतही दिले. आनंदघन या नावाने त्यांनी साधी माणसं, तांबडी माती, मराठा तितूका मेळवावा या चित्रपटांना संगीत दिले. साधी माणसं या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला. रामराम पाव्हणं या एकमेव चित्रपटाला त्यांनी लता मंगेशकर या नावाने संगीत दिले. तर इतर चित्रपटांना त्यांनी आनंदघन या नावाने संगीत दिले.

पा लागों कर जोरी

लता दीदींनी आप के सेवा में या चित्रपटातील ' पा लागों कर जोरी या  गाण्यांमधून त्यांनी हिंदी पार्श्वगायनाला सुरुवात केली. लतादीदींना १९५८ मध्ये 'मधुमती' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर  १९६२ साली 'बीस साल बाद' या चित्रपटातील त्यांना 'कहीं दीप जले कहीं दिल…' या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

लग जा गले, बच्चे मन के सच्चे, कहीं दीप जले कहीं दिल,  ए मेरे वतन के लोगो, लेक लाडकी या घरची, आयेगा आनेवाला, एक प्यार का नगमा हैं, तेरे बिना जिंदगी से, लारा लप्पा, बहारें फिर भी आयेंगी अशी बरीच सुपरहिट गाणीं लतादिदींनी गायली.

लता मंगेशकर
लता मंगेशकर

'मेरी आवाज ही पहचान है..'

भारताचा अभिमान असलेल्या लतादीदींनी मन्ना डे, मुकेश, महम्मद रफी, किशोरकुमार, हेमंतकुमार या सारख्या दिग्गज पार्श्वगायकांसह गाणी गायली. लता दीदींनी आपल्या सूरेल आवाजात ३७ हून अधिक प्रादेशिक आणि विदेशी भाषांमधील गाणीं गायली. १९४९ साल हे लतादीदींच्या कारकीर्दीतले सर्वांत महत्त्वाचे वर्ष मानावे लागेल. या वर्षात आठ चित्रपटातील त्यांच्या २६ गाण्यांना लोकप्रियता मिळाली आपल्या आवाजाने रसिकांना वेड लावणार्या लतादीदींनी १९५१ साली सर्वात जास्त म्हणजे साधारणपणे २२५ गाणी गायली. कवी प्रदीप यांनी लिहीलेल्या व सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले "ए मेरे वतन के लोगो" हे गाणं आठवल्या शिवाय राहत नाही. १९९४ या वर्षातील 'हम आपके है कौन' या चित्रपटातील 'दीदी तेरा देवर दीवाना' या गाण्याने चित्रपट सृष्टीतील आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडले. त्यांनी आतापर्यंत गायलेल्या गाण्यांनी  रसिकमनांवर राज्य केलयं आणि कायम राहील. खूप लोकांना माहित आहे की, लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गायणाऱ्या लतादीदी या पहिल्या भारतीय आहेत.

'मेरी आवाज ही पहचान है..'
'मेरी आवाज ही पहचान है..'

संगीतविश्वातील एक युग काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्या गाण्यातून कायम सर्वांच्या मनावर राज्य करतील. आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पाहा व्हिडिओ :अभिनेते रमेश देव यांची ग्रेट भेट | 95 वर्षांचा आनंदी प्रवास

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news