पौड रोड: नागरिक काही काम करत असताना जखमी झाला किंवा अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना सर्जरी कॅज्युअल्टीमध्ये येताच काही वेळात धनुर्वात प्रतिबंधक लस टोचली जाते.
विशेष की, औषधांचा तुटवडा असताना याची माहिती वैद्यकीय डॉक्टर असो की, अधीक्षक कार्यालयाला धनुर्वातची लस देण्यास टाळाटाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूडमधील पुणे महानगरपालिकेचे कै. जयाबाई नानासाहेब सुतार (मॅटरनिटी हॉस्पिटल), नानासाहेब सुतार (दवाखाना), कै. शंकरराव धोंडिबा सुतार (मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) येथे घडल्याने रुग्णांसहित इतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
कोथरूडमधील नागरिकांसहित इतर भागातील गरीब रुग्ण येत असतात. मोठ्या दवाखान्यात जाण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने सामान्य नागरिक पालिकेच्या दवाखान्यात येत असतात. मात्र, बीपीएलमध्ये मोडणाऱ्या रुग्णांच्या हाती प्रिस्क्रिप्शन दिले जाते. मेडिकलमध्ये औषध खरेदीचे धोरण राबवण्यासाठी ‘फॉर्म क’ विभाग आहे. मात्र, मेडिकलमध्ये उपचारासाठी येणारा गरीब वर्ग औषध मिळेल, मोफत उपचार होतील, या आशेवर येत असतात.
राज्याच्या सरकारी रुग्णालयात धनुर्वात प्रतिबंधक सर्जरी विभाग असणे आवश्यक आहे. मात्र, ही लस नातेवाइकांनाच बाहेरून खरेदी करून आणावी लागते. अपघातामध्ये जखमींना लोखंडी खिळा, पत्रा लागल्याची भीती असते. यामुळे जखम होते. त्यावेळी धनुर्वात प्रतिबंधक लस म्हणून देण्यात येते. हे इंजेक्शन उपलब्ध नाही. सोबतच मेडिकलच्या सर्जरी कॅज्युअल्टीमध्ये साधे स्पिरीटही उपलब्ध नसल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली आहे.
यासंदर्भात मनपा वैद्यकीय अधिकारी अंजली टिळेकर यांच्यासह सुतार दवाखान्यातील डॉ. मीनल विचालकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या कोणताही प्रतिसाद दिला नाही. मी काम करत असताना मला दुखापत झाल्याने मी दवाखान्यात आल्यावर मला धनुर्वात प्रतिबंधक लस बाहेरून आणा, असे सांगण्यात आले.
कृष्णा येलेकर, आझादनगर, कोथरूड.