Pollution Impact On Pregnant Women: प्रदूषणाचा ‘गर्भवती महिला व लहान मुलांवर’ थेट घातक परिणाम! डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पुणे AQI पुन्हा ‘खराब’ श्रेणीत; अकाली प्रसूती, दमा, श्वसन त्रास वाढण्याची गंभीर भीती व्यक्त
Pregnant Women
Pregnant WomenPudhari
Published on
Updated on

पुणे: अनियंत्रित शहरीकरण आणि वाहनांच्या वाढत्या धुरामुळे प्रदूषणाची समस्या देशासाठी एक गंभीर आरोग्य संकट बनले आहे. दिल्लीमध्ये काही आठवड्यांपासून ‌‘एअर क्वालिटी इंडेक्स‌’ 400 हून अधिक नोंदवण्यात आला असून, तो ‌‘गंभीर‌’ श्रेणीत मोडतो.

Pregnant Women
Education Department Corruption: शिक्षण विभागातील भष्ट्राचार उफाळला! शिक्षकांच्या फाईल्स ‘लाच’ शिवाय हलतच नाहीत

गेल्या काही दिवसांत शहरातील ‌‘एक्यूआय‌’ सातत्याने 200 च्या वर गेला असून, तो ‌‘खराब‌’ श्रेणीमध्ये मोडत आहे. त्या अनुषंगाने दीर्घकालीन प्रदूषण हे गर्भवती महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

Pregnant Women
Bank Fraud: ‘भोंदू’ पंढरपूरकर दाम्पत्याचा करोडोंचा घोटाळा उघड – 1139 व्यवहारांनी पोलिसही चकित!

महानगरांमध्ये त्यातही पुण्यातील वाढत्या प्रदूषणाचा गर्भवती महिलांवर आणि मुलांवर अतिशय घातक परिणाम होत आहे. दूषित हवेमुळे मुलांना घरघर, श्वास घेण्यास त्रास आणि दमा होण्याचा धोका वाढतो. याशिवाय पुण्यातील विषारी हवा गर्भवती महिलांसाठीही गंभीर श्वसनासंबंधी अडचणी निर्माण करू शकते.

Pregnant Women
Illegal Pistol Smuggling: उमरटीतून महाराष्ट्रात हजार पिस्तुले! पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

गर्भवती महिलांवरील प्रदूषणाचे दुष्परिणाम

  • गर्भपात, मृतजन्म आणि अकाली प्रसूतीचा वाढलेला धोका

  • बाळाचे कमी वजन आणि गर्भाच्या वाढीमध्ये मर्यादा

  • उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका

  • प्लासेंटाचे नुकसान आणि बाळाकडे जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात घट

Pregnant Women
Libraries Grant Hike: ग्रंथालयांना 40% अनुदानवाढीची प्रतीक्षा; शासनाचा जीआर अद्याप गायब!

प्रदूषणाचे मुलांवरील दुष्परिणाम

  • दमा, न्युमोनिया यासारखे श्वसनाचे गंभीर त्रास.

  • ॲलर्जी आणि शिकण्यात अडचणी येण्याचा धोका.

  • फुप्फुसांची वाढ खुंटणे आणि क्षमता कमी होणे.

  • संसर्ग आणि आजारांची लागण होण्याची शक्यता.

‌‘एअर प्युरिफायर‌’ आणि ‌’एन 95‌’ मास्कचा वापर करा. प्रचंड प्रदूषणाच्या वेळी घरातील खिडक्या बंद ठेवा. अँटिऑक्सिडंटयुक्त आहार घ्या आणि पुरेसे पाणी प्या. प्रदूषणाची पातळी अधिक असताना घराबाहेर पडणे टाळा. ही काळजी वेळेवर घेतली तर प्रदूषणामुळे होणाऱ्या गंभीर आरोग्य धोक्यांपासून बचाव करता येऊ शकतो.

डॉ. जयंत खंदारे, पेडियाट्रिक्स आणि निओनेटोलॉजी सल्लागार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news