Tea Price Hike: कपभर चहाचा गोडवाही महागला! साखरेच्या दरवाढीने चहाचे दर वाढले

रोजच्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या खर्चांवर महागाईची सावली अधिक गडद
Tea
TeaPudhari
Published on
Updated on

पुणे: सकाळची सुरुवात असो, अथवा दुपारची थकवा घालवणारी विश्रांती... हातात वाफाळता चहाचा कप आला की दिवसाला जरा गती मिळते. त्यातच मित्र-मैत्रिणी भेटल्या, चर्चा करायची म्हणून सोबत कपभर चहाचा लागणारा घोट आता दुरावा निर्माण करणारा असल्याचे दिसून येते.

या कपातील गोडवा आता खिशाला चटका देऊ लागला आहे. साखरेच्या किमती वाढल्याने हॉटेल, उपाहारगृहे आणि चहाच्या छोट्या व्यावसायिकांनी चहाच्या दरातही वाढ केली आहे.

Tea
Jejuri Accident News: जेजुरी एमआयडीसीतील शालिना चौकात तीन दुचाकींचा अपघात; सहा जण जखमी

चहाच्या एका कपासाठी लागणारी साखर मोजकी असली, तरी हजारो कपांच्या हिशेबात तिचा खर्च वाढतो. त्यातच नुकतीच दूध, चहा पावडर, गॅस आणि इतर साहित्याच्या वाढत्या दरांची भर पडली आहे. त्यामुळे व्यावसायिकांसमोर दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे छोटे-मोठे व्यावसायिक सांगत आहे.

Tea
Pune Noise Pollution: ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन द्या; ‘अलर्ट’ची पोलीस आयुक्तांकडे मागणी

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नारायण पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ आणि इतर पेठांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चहाच्या छोट्या मोठ्या टपऱ्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांपासून, लहान मोठ्या कार्यालयांचे कर्मचारी, व्यावसायिकांचे कामगार आणि इतर व्यक्तींची चहाच्या घोटासाठी गर्दी असते.

दोन दिवसांपूर्वी कपभर चहासाठी १५ ते २० रुपये मोजले जात होते. आता हाच कपभर चहा २५ रुपयांवर पोहोचला आहे. काही ठिकाणी चहाच्या दरात एक ते दोन रुपयांची वाढ करण्यात आली असून, विशेष चहाच्या दरातही बदल झाले असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येते.

एकंदरीत साखरेपासून सुरू झालेली ही दरवाढ आता चहाच्या कपापर्यंत पोहोचली असून, रोजच्या जगण्यातल्या छोट्या-छोट्या खर्चांवर महागाईची सावली अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news