

जेजुरी: शुक्रवारी (दि. २८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जेजुरी एमआयडीसी येथील शालिना चौकात तीन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात सहाजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी एमआयडीसी रस्त्यावर शालिनी कंपनीच्या चौकात दोन दुचाकींची धडक झाल्यानंतर त्यावरील युवक तिसऱ्या दुचाकीवर पडल्याने तीन दुचाकींचा अपघात झाला.
या घटनेत दोन जण गंभीर जखमी असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर चार जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमी नावे अद्याप समजू शकली नाहीत.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या अपघाताचा पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण व इतर तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होतील.