Pune Tangerine Orange: पुणेकरांना भुरळ घालणाऱ्या टँजेरियन संत्र्याची आवक वाढली; गुलटेकडी बाजारात तीन टनांचा टप्पा

अहिल्यानगर-शिरूरमध्ये लागवडीला वेग; आठ ते दहा दिवस टिकणाऱ्या संत्र्याला ग्राहकांची पसंती, किलोला २५ ते ७० रुपये भाव
Tangerine Orange
Tangerine OrangePudhari
Published on
Updated on

पुणे: आकर्षक रंग, आंबट-गोड चव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गोडव्यामुळे टँजेरियन संत्र्याने पुणेकरांना भुरळ घातली आहे. पंजाबवरून आलेल्या संत्रीच्या रोपांची अहिल्यानगर आणि शिरूर परिसरात मागील तीन-चार वर्षांत या संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली असून, नव्या बागांना फळधारणा सुरू झाल्याने उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात टँजेरियन संत्र्याची आवक पहिल्यांदाच दोन टनाचा टप्पा ओलांडून तीन टनांवर पोहोचली आहे.

Tangerine Orange
Pune Document Registration: पुण्यात दस्तनोंदणीला मिळणार गती; १७ सह दुय्यम निबंधकांची नियुक्ती, २१ रिक्त पदांवर सरकारची कारवाई

बाजारात प्रामुख्याने अहिल्यानगर आणि शिरूर परिसरातून टँजेरियन संत्री विक्रीसाठी दाखल होत आहेत. दर्जानुसार घाऊक बाजारात दहा किलोला १५० ते ५०० रुपये भाव मिळत असून, किरकोळ बाजारात किलोला २५ ते ७० रुपये दराने विक्री होत आहे. आकर्षक दिसण्याबरोबरच तुलनेने अधिक काळ टिकत असल्याने ग्राहकांकडूनही या संत्र्याला चांगली पसंती मिळत आहे.

Tangerine Orange
Pune CNG Shortage: पुण्यात सीएनजीसाठी ३ ते ५ तास प्रतीक्षा; ७.५० लाख वाहनांसाठी केवळ १३३ पंप

विशेष म्हणजे, टँजेरियन संत्री आठ ते दहा दिवस सहज टिकतात. साठवणुकीच्या दिवसांनुसार त्यांचा आंबटपणा कमी होऊन गोडवा वाढतो आणि फळाला अधिक आकर्षक रंग येतो. त्यामुळे बाजारात या संत्र्याची मागणी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. टँजेरियनबरोबरच बाजारात नेहमीच्या संत्र्यांचीही दररोज सुमारे दोन टन आवक होत आहे. या संत्र्यांना दर्जानुसार दहा किलोला १५० ते एक हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

Tangerine Orange
UPSC CDS 2 Exam 2026: UPSC CDS 2 परीक्षा 2026चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबरला तीन सत्रांत परीक्षा

मागील तीन ते चार वर्षांत अहिल्यानगर आणि शिरूर परिसरातील शेतकऱ्यांचा टँजेरियन संत्र्याच्या लागवडीकडे कल वाढला आहे. मागील काही वर्षांपासून तुरळक स्वरूपात ही संत्री बाजारात दाखल होत होती. आता या बागांना मोठ्या प्रमाणात फळधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे उत्पादन वाढून मागील वर्षापर्यंत एक टनापर्यंत होणारी आवक यंदा प्रथमच दोन टनापार गेली आहे. आगामी काळात उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोनू ढमढेरे, संत्री अडतदार

Tangerine Orange
Pune School Bus Safety Rules: पुण्यात स्कूल बससाठी नवे सुरक्षा नियम; नियमभंग केल्यास परवाना निलंबित किंवा रद्द

आम्ही २५ एकरांत टँजेरियन संत्रीची लागवड केली आहे. तीन वर्षांत झाडांना फळधारणा सुरू होते. सुरुवातीच्या टप्प्यात कमी प्रमाणात फळे उपलब्ध झाली होती. मात्र, आत्ता मोठ्या प्रमाणात फळधारणा होऊ लागली आहे. बाजारात 22 किलोंचे २५० ते ३०० क्रेटस्‌ बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. त्याला दरही चांगले मिळत आहे.

राजकुमार चव्हाण, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news