Pune Document Registration: पुण्यात दस्तनोंदणीला मिळणार गती; १७ सह दुय्यम निबंधकांची नियुक्ती, २१ रिक्त पदांवर सरकारची कारवाई

‘पुढारी’च्या वृत्ताची राज्य सरकारकडून दखल; पुणे विभागाला मिळाले ४२ अधिकारी, दस्तनोंदणी कार्यालयांचा कारभार सुधारणार
Office
OfficePudhari
Published on
Updated on

पुणे: राज्याच्या महसुलात वर्षाला १० हजार ८५१ कोटी रुपयांची भर घालणाऱ्या पुणे शहरातील दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली होती. शहरातील २७ कार्यालयांपैकी तब्बल २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त होती. याबाबत सविस्तर वृत्त दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाले होते. राज्य सरकारने याची दखल घेतली असून, तातडीने या रिक्त पदांवर १७ सह दुय्यम निबंधकांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे दस्तनोंदणीच्या कामकाजाला आता गती मिळणार आहे.

Office
Pune CNG Shortage: पुण्यात सीएनजीसाठी ३ ते ५ तास प्रतीक्षा; ७.५० लाख वाहनांसाठी केवळ १३३ पंप

राज्याच्या महसूल विभागाने दुय्यम निबंधक श्रेणी-१ या अराजपत्रित गट-ब संवर्गातील १६० अधिकाऱ्यांना सह जिल्हा निबंधक वर्ग-२, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ तथा मुद्रांक उपअधीक्षक या संवर्गात पदोन्नती देण्याचा निर्णय २७ जुलै रोजी घेतला. नोंदणी व मुद्रांक विभागात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा विभागाने केला आहे.

Office
UPSC CDS 2 Exam 2026: UPSC CDS 2 परीक्षा 2026चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबरला तीन सत्रांत परीक्षा

या पदोन्नतीमध्ये पुणे विभागाच्या वाट्याला ४२ अधिकारी आले आहेत. त्यापैकी पुणे शहरातील दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या १७ पदांवर सह दुय्यम निबंधक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत वरिष्ठ लिपिक अथवा अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार असलेल्या कार्यालयांना नियमित अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Office
Pune School Bus Safety Rules: पुण्यात स्कूल बससाठी नवे सुरक्षा नियम; नियमभंग केल्यास परवाना निलंबित किंवा रद्द

नऊ कार्यालयांना अधिकारी नाहीत

पुणे शहरातील हवेली क्रमांक २, ७, ८, १२, २१, २२, २३, २४ आणि २६ या नऊ कार्यालयांना सध्या पूर्ण वेळ सह दुय्यम निबंधक आहेत. उर्वरित कार्यालयांमध्ये पदोन्नतीने अधिकारी देण्यात आले आहेत. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित कार्यालयांमधील दस्तनोंदणी, मुद्रांक शुल्कनिश्चिती आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास गती मिळणार आहे.

Office
Pune Drunk Youth Car Stunt: पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट; लॉ कॉलेज रोडवर धिंगाणा, पाच जण ताब्यात

सह दुय्यम निबंधकाचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

हवेली क्रमांक २० या कार्यालयातील सह दुय्यम निबंधक सध्या सह जिल्हा निबंधक वर्ग-२ पदावर आहेत. त्यांच्याकडे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ या पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. हवेली क्रमांक २४ कार्यालयातील सह दुय्यम निबंधकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांचा अर्ज मंजूर झाल्यास या कार्यालयासाठी पुन्हा स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे येथे अधिकारी कार्यरत असले, तरी पद रिक्त होण्याची शक्यता कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news