ताम्हिणी घाट दुर्घटना : मुलीने व्हिडिओ काढला अन्‌ बाप वाहून जाताना क्षण कॅमेराबद्ध

ताम्हिणी घाट दुर्घटना: बाप वाहून जातानाचे दुःखद क्षण मुलीने केले कॅमेराबद्ध
Tamhini ghat plus vally accident
ताम्हिणी घाटातील धबधब्यात एक जण वाहून गेला Pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ताम्हिणी घाट येथे एक जण धबधब्याच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याचे शोधकार्य सुरु झाले. स्वप्नील धावडे असे त्याने नाव होते. तो ताम्हिणी घाटात मुलांना ट्रेकिंगसाठी घेऊन गेला होता. पण, तेथील वाहत्या धबधब्यात त्याने सूर लावला अन्‌ क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. धबधब्याचा प्रवाह इतका मोठा होता की, तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्याची मुलगी तेथेच होती. दुर्दैवाने तिच्या कॅमेरामध्ये हे क्षण टिपले गेले. आणि स्वत: चा बाप वाहून जाताना धक्कादायक घटना कॅमेराबद्ध झाली.

Tamhini ghat plus vally accident
Zika Virus| झिका रुग्णांच्या एक कि. मी. परिसरात फवारणी
Summary

स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू होते. त्यांनी भारतीय सैन्य दलातही सेवा दिली होती. दुर्देवाने ते ताम्हिणी घाटातील धबधब्यात गेले अन्‌ वाहून गेले.

नेमकं काय घडलं?

स्वप्नीलने धबधब्याच्या प्रवाहात सूर मारला. त्यावेळी तो पुन्हा खडकांच्या सहाय्याने वर येण्याचा प्रयत्न करत होता. दोन वेळा त्याने पोहत खडकांजवळ येण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याचा जोरदार प्रवाहाने त्याचा हात खडकांवरून निसटत होता. बघता बघता तो दरीत वाहून गेला. हे सारं त्याच्या मुलीच्या डोळ्यादेखत घडले. ती आपल्या वडिलांच्या पोहायचा तो क्षण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होती. पण, या कॅमेरासमोर अन्‌ मुलीच्या डोळ्यांदेखत तिचे वडील पाण्यातून वाहत दरीत गेले.

या हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tamhini ghat plus vally accident
BJP News| पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन; प्रादेशिक समतोलही साधला

व्हिडिओ काढ असे मुलीला सांगितले...

ताम्हिणी घाटातून सर्वजण निघण्याच्या तयारीत असताना स्वप्नील यांनी आपल्या मुलीला आणखी एक व्हिडिओ काढ असे सांगितले. तेव्हा त्यांनी पाण्यात उडी मारली. पण, पाण्यातून परत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.

ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीत एक जण गेला वाहून

पौड : पुढारी वृत्तसेवा - मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील प्लस व्हॅलीच्या परिसरातील पाण्याच्या कुंडात शनिवारी (दि. २९) दुपारी वाहून गेलेल्या स्वप्निल धावडे (वय ३८, रा. भोसरी, पिंपरी-चिंचवड) याचा ५० जणांच्या बचाव पथकाने दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ३०) शोध घेऊनही तो सापडला नव्हता. सोमवार, दि. १ जुलै रोजी शोधकार्य पुन्हा सुरू करण्यात आले.

Tamhini ghat plus vally accident
Katraj-Kondhwa Road|... अखेर राज्य सरकारचा निधी आला

शनिवारी दुपारी स्वप्निल व त्याचे मित्र प्लस व्हॅली परिसरात पर्यटनासाठी आले होते. स्वप्निल पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे वाहून गेला. एका कुंडातून दुसऱ्या कुंडात तो वाहून गेला. जोराच्या पावसामुळे प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह अधिक तीव्र होता. त्यानंतर मात्र तो दिसून आला नाही. पौड पोलिस, ताम्हिणी वन विभाग, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समिती संस्था, शिवदुर्ग टीम लोणावळा, नातेवाईक यांनी प्लस व्हॅलीच्या वरील बाजूच्या पाण्याच्या दोन कुंडांमध्ये व आसपासच्या परिसरात स्वप्निलचा शोध घेतला.

तर रोहा - रायगड रेस्क्यू टीम, शेलारमामा रेस्क्यू टीम यांच्या पथकाने प्लस व्हॅलीतून खालील बाजूस प्रवाहित होऊन तयार होणाऱ्या देवकुंड धबधब्याच्या परिसरात शोध घेतला. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते. जोराचा पाऊस, दाट धुके, निसरडे वातावरण यामुळे शोधकार्यात वारंवार अडथळे येत होते. सायंकाळी अखेर अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

दोन दिवसांत दोन जण बुडाले

प्लस व्हॅली व मिल्कीबार धबधबा येथे मौजमजा करण्यासाठी येत असलेले पर्यटक आपल्या जिवाची पर्वा न करता खाली खोल दरीत उतरत आहेत. मात्र, यामध्ये शुक्रवारी (दि. २८) आदेश पवार या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर शनिवारी (दि. २९) स्वप्निल धावडे हा वाहून गेला.

Video- huntforspot Instagram वरून साभार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news