BJP News| पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन; प्रादेशिक समतोलही साधला

विधान परिषदेच्या उमेदवार यादीत भाजपने साधले सोशल इंजिनिअरिंग
Pankaja Munde's political rehabilitation also achieved regional balance
पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसनfile photo
Published on
Updated on

२०१९ पासून राजकीय वनवास सहन करणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांचे भाजपश्रेष्ठींनी राजकीय पुनर्वसन केले आहे.

Pankaja Munde's political rehabilitation also achieved regional balance
विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक बिनविरोध होणार?

१२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासोबतच मित्रपक्षातील माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार

योगेश टिळेकर, अमित गोरखे यांनाही उमेदवारी योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांनाही संधी देत भाजपने सोशल इंजिनिअरिंग साधतानाच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. विधानसभेच्या आमदारांच्या मतदानाने विधान परिषदेसाठी ११ सदस्य निवडले जाणार आहेत.

Pankaja Munde's political rehabilitation also achieved regional balance
Jalgaon Crime | गुरे चोरणाऱ्या टोळीच्या अखेर आवळल्या मुसक्या

या निवडणुकांसाठी भाजपकडून सोमवारी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात पंकजा मुंडे यांना संधी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. यासोबतच, महायुतीतील घटकपक्ष असणाऱ्या रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

खोत यांच्या उमेदवारीने शेती प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्याला संधी देतानाच घटकपक्षालाही प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. याशिवाय, विदर्भातील नेते आणि माजी आमदार परिणय फुके यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे.

Pankaja Munde's political rehabilitation also achieved regional balance
Katraj-Kondhwa Road|... अखेर राज्य सरकारचा निधी आला

फुके हे विदर्भातील कुणबी समाजातून येतात. यासोबतच, भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे पदाधिकारी आणि मातंग समाजातील तरुण नेते अमित गोरखे यांच्या उमेदवारीने दलित प्रतिनिधित्वाचे संतुलन साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.

भाई गिरकर यांचा परिषदेतील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या जागी मातंग समाजातील गोरखे यांच्या निमित्ताने नवीन नेतृत्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. उच्चशिक्षित असलेल्या गोरखे यांच्या शिक्षण संस्थाही आहेत. भाजपच्या ओबीसी मोर्चाचे तसेच युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेल्या योगेश टिळेकर यांनाही विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. माळी समाजातील नेतृत्व, अशी टिळेकर यांची ओळख आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news