Takali Haji Police Complaint: टाकळी हाजी पोलिस चौकीत शेतकऱ्याला मारहाण केल्याचा उपनिरीक्षकावर आरोप; वरिष्ठांकडे चौकशीची मागणी

चौकशीसाठी बोलावून शिवीगाळ, मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा रावसाहेब घोडे यांचा दावा; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

टाकळी हाजी: पोलिस उपनिरीक्षकावरच नागरिकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाल्याने शिरूर पोलिस ठाण्यांतर्गत असलेली टाकळी हाजी चौकी पुन्हा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी लाचखोरीच्या गुन्ह्यामुळे ही चौकी चर्चेत आली होती.

Police
Fodder Cultivation On Reservoir Land: दुष्काळी भागातील शेतकरी, पशुपालकांना दिलासा; तलावांतील गाळपेर जमिनीवर चारा लागवडीस परवानगी

चौकशीसाठी चौकीत बोलावून मारहाण, शिवीगाळ, मोबाईल हिसकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रावसाहेब सुखदेव घोडे (वय ३४, रा. टाकळी हाजी) या शेतकऱ्याने केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Police
Pune Crime: जावयाचा मारहाणीत मृत्यू; दुचाकी अपघाताचा बनाव रचणारे आजेसासरे आणि सासरे अटकेत

घोडे यांच्या तक्रारीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी शेतीच्या वादातून त्यांचा चुलतभावाच्या कुटुंबीयांशी वाद झाला होता. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी चौकीत तक्रार दिली होती. मध्यस्थीने हा वाद मिटविण्यात आला. त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी हवालदार वायाळ यांनी फोन करून घोडे यांना चौकशीसाठी बोलावले. चौकीत गेल्यानंतर उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी त्यांना दमदाटी केली. संबंधित अधिकारी गणवेशात नव्हते तसेच त्यांनी सुरुवातीला स्वतःची ओळखही स्पष्ट केली नाही, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

Police
Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; मुख्यालय रिकामे, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

चौकशीदरम्यान त्यांनी मारहाण करून मोबाईल हिसकावत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे घोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या वेळी तक्रारदारांचे मेहुणे अमित मेचे, उपनिरीक्षक राहुल भागवत हे घटनास्थळी होते असे तक्रारीत म्हटले आहे. घोडे यांचे कुटुंबीय चौकीत आल्यानंतर त्यांच्याशीही अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.

Police
Pune Chhath Puja: पुण्यात छठपूजेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार; महापालिकेचे स्वतंत्र धोरण आणि निधीचा ठराव मंजूर

संबंधित उपनिरीक्षकाची घटनेपूर्वीच अन्यत्र बदली झाल्याची माहिती तक्रारदाराने दिली. त्यामुळे बदली आदेश, कार्यमुक्तीची तारीख, पदभार हस्तांतरण तसेच तपास हवालदार वायाळ यांच्याकडे असताना ५ नोव्हेंबर रोजी खटिंग यांना चौकशी करण्याचा अधिकार होता का, याचीही तपासणी करण्याची मागणी घोडे यांनी केली आहे. याबाबत शिरूरचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.