Pune Crime: जावयाचा मारहाणीत मृत्यू; दुचाकी अपघाताचा बनाव रचणारे आजेसासरे आणि सासरे अटकेत

पत्नीला शोधत सासरी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण; लोणीकंद पोलिसांनी दांडके जप्त करून दोघांना केली अटक
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: जावयाचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या आजे सासरा आणि सासऱ्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. सुलतान सादिक शेख (वय २४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रहीम मोहम्मद शेख (वय ६५) आणि अमर रहीम शेख (वय ४५, दोघे रा. चौफुलावस्ती, कोलवडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुलतानचा भाऊ साबीर सादिक शेख (वय २६) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Crime News
Pune Municipal Corporation Bomb Threat: पुणे महापालिकेला बॉम्बस्फोटाची धमकी; मुख्यालय रिकामे, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी

पोलिसांच्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेल्या सुलतानचा तीन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. काही कारणांवरून त्याचे पत्नीशी वाद झाले होते. त्यानंतर ९ नोव्हेंबर रोजी सासू आणि सासरे त्याच्या पत्नीला घेऊन माहेरी गेले होते. पत्नीचा शोध घेत सुलतान रात्री चौफुलावस्तीतील सासरी पोहोचला.

Crime News
Pune Chhath Puja: पुण्यात छठपूजेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार; महापालिकेचे स्वतंत्र धोरण आणि निधीचा ठराव मंजूर

त्यावेळी आजेसासरे रहीम शेख आणि सासरे अमर शेख यांनी त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुलतानचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी सुलतानला रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला मृत घोषित केले. मात्र, सुलतानचा दुचाकीवरून पडून अपघात झाल्याने मृत्यू झाल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला अपघाती मृत्यूचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Crime News
Pune Road Survey: पुण्यातील रस्त्यांवर आठवडाभरात ९३ लाख धक्क्यांची नोंद; २४ हजार वाहनांच्या सर्वेक्षणातून दुरवस्थेचे वास्तव उघड

दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, आरोपींच्या घरासमोर अपघात झाल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. घटनास्थळी दुचाकी पडलेली नव्हती किंवा अपघात झाल्याचे पुरावेही दिसून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशी केली असता, दोन्ही आरोपींनी सुलतानला मारहाण केल्याची कबुली दिली.

Crime News
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठरावावर २८ नोव्हेंबरला निर्णय; पदाधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी

त्याला मारहाण करण्यासाठी वापरलेले लाकडी दांडके पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीता रोकडे यांनी या कारवाईची माहिती दिली. पोलिस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.