Pune Chhath Puja: पुण्यात छठपूजेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार; महापालिकेचे स्वतंत्र धोरण आणि निधीचा ठराव मंजूर

कृत्रिम तलाव, तात्पुरते घाट, स्वच्छता, सुरक्षा आणि विद्युत रोषणाईची सुविधा मिळणार; नगरसेवक सुहास टिंगरे यांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर
Chhath Puja
Chhath PujaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: छठपूजा उत्सवाच्या आयोजनासाठी दरवर्षी होणारी धावपळ थांबवून महापालिकेने आता कायमस्वरूपी नियोजन करावे, यासाठी स्वतंत्र वार्षिक धोरण आणि अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव स्थायी समितीत मंजूर झाला आहे. नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी हा ठराव मांडला होता. यामुळे छठपूजेसाठी कृत्रिम तलाव, तात्पुरते घाट, स्वच्छता, विद्युत रोषणाई, सुरक्षा आणि अन्य नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Chhath Puja
Pune Road Survey: पुण्यातील रस्त्यांवर आठवडाभरात ९३ लाख धक्क्यांची नोंद; २४ हजार वाहनांच्या सर्वेक्षणातून दुरवस्थेचे वास्तव उघड

शहरात उत्तर भारतीय नागरिकांकडून छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान नदी, तलाव आणि जलाशयांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक धार्मिक विधींसाठी एकत्र येतात. त्यामुळे भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात पूजा करता यावी, यासाठी महापालिकेने स्वतंत्र धोरण आखावे, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली आहे.

Chhath Puja
Maharashtra Sahitya Parishad: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील अविश्वास ठरावावर २८ नोव्हेंबरला निर्णय; पदाधिकाऱ्यांना बाजू मांडण्याची संधी

मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या धर्तीवर पुण्यातही कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. या नियोजनाअंतर्गत शहरातील संभाव्य पूजास्थळांची पाहणी करून योग्य जागा निश्चित करणे, आवश्यकतेनुसार कृत्रिम तलाव आणि तात्पुरते घाट उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, निर्माल्य संकलन आणि महिलांसाठी स्वतंत्र वस्त्रांतरगृहे उभारण्याचा समावेश आहे. तसेच विद्युत रोषणाई, जनरेटर, दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग, अग्निशामक दल, पोलिस बंदोबस्त, जीवरक्षक आणि वैद्यकीय पथके तैनात करण्याचे नियोजनही करण्यात येणार आहे.

Chhath Puja
Pune Grand Tour: पुणे ग्रँड टूरसाठी रस्तेविकासकामांना वेग; २० नोव्हेंबरनंतर खोदाई केल्यास चौपट शुल्क

भाविकांसाठी स्वतंत्र पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन करण्याबरोबरच छठपूजा मंडळांना विविध विभागांच्या परवानग्या एकाच खिडकीतून मिळाव्यात, अशी तरतूदही ठरावात आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्याची मागणी केली आहे. उत्सवाच्या किमान एक महिना आधी तयारी सुरू करून वार्षिक अंदाजपत्रकात स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचेही प्रस्तावित आहे.

Chhath Puja
Pune Municipal Corporation Stamp Duty Dues: पुणे महापालिकेचे १२०० कोटी रुपये शासनाकडे थकीत; विकासकामांसाठी कर्ज घेण्याची वेळ

'पुणे हे सर्व धर्म आणि संस्कृतींचा आदर करणारे शहर आहे. प्रत्येक नागरिकाला आपली धार्मिक परंपरा सुरक्षितपणे आणि सन्मानाने साजरी करता यावी, ही महापालिकेची जबाबदारी आहे. दरवर्षी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आवश्यक आहे,' असे सुहास टिंगरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.