Supriya Sule On Rohit Pawar: रोहित सगळी जबबादारी घेतोय... वहिनींच्या प्रचाराला जाताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule On Rohit Pawar
Supriya Sule On Rohit Pawarpudhari
Published on
Updated on

Supriya Sule On Rohit Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या बारामती पोट निवडणुकीत वहिनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. अजित पवार यांच्या दुःखद मृत्यूनंतर होत असलेली बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यानंतर आता सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत पोहचल्या आहेत.

याबाबत बोलताना कुटुंब म्हणून मी वहिनींचा प्रचार करणार आहे असं सांगितलं. तसंच त्यांनी अजित पवार यांच्या मृत्यू झाला. ते सत्तेत होते मात्र तरी एफआयआर दाखल झाली नाही यावरून नाराजी व्यक्त केली. तसेच रोहित आता सगळी जबाबदारी घेत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केली.

Supriya Sule On Rohit Pawar
Supriya Sule On Parth Pawar: हा मोकळा श्वास काँग्रेसमुळेच घेतोय.... सुप्रिया सुळेंच्या पार्थ पवारांना कानपिचक्या

वहिनींचा फोन फोन आला होता

सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाण्याबाबत बोलताना म्हणाल्या की, 'मला काल वहिनींचा फोन आला होता. कुटुंब म्हणून प्रचाराला या असं त्या म्हणत होत्या. आम्ही आधी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भूमिका घेतली होती. आता प्रचाराबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले. दोघांनीही कुटुंब म्हणून तुम्ही जा असं सांगितलं आहे.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, 'निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महाविकास आघाडीची इच्छा आहे. पवार साहेब सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या काही टेस्ट सुरू आहेत.'

Supriya Sule On Rohit Pawar
Supriya Sule Statement: दिल्लीतील लोक माझी चेष्टा करू लागलेत... सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

मतभेद मात्र मनभेद नाहीत

अजित पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी माझे मतभेद आहेत. माझे कोणाशी मनभेद नाहीत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही पाठिंबा दिला. माझा भाऊ गेलाय.. आज पण अंगावर काटा येतो... दादा खरंच गेलाय का असा प्रश्न पडतो.' जुन्या आठवणींना उजाळा देताना सुळे म्हणाल्या, दादा आणि साहेब फक्त फॉर्म भरायचे शेवटी सभा घ्यायचे.

Supriya Sule On Rohit Pawar
Sanjay Raut | "बिनविरोध निवडणूक हा शेतकरी, कष्टकऱ्यांवरील अन्याय" : बारामती पोटनिवडणुकीबाबत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

रोहित जबाबदारी घेतोय

विमान अपघातातबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी, विमान अपघाताबाबतच्या प्रकरणाची रोहित सगळी जबाबदारी घेत आहे. एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अपघात होतो. साधा एफआयआर होत नाही. एफआयआर करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. दादा सत्तेचा मोठा भाग होता. तरी एफआयआर दाखल होत नाही.

जय पवार बाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जयचे स्टेटमेंट आले आहे. रोहित दादा म्हणतोय ते मला मान्य आहे असं तो म्हणतोय. खरं काय ते देशासमोर आलं पाहिजे.

Supriya Sule On Rohit Pawar
Supriya Sule On Satara Politics: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता मग मार कसला खाता... सुळे थेटच बोलल्या

आमच्यावर अन्याय झाला

निवडणूक आयोगाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही फार निराश आहोत. पक्ष स्थापन कोणी केला पवार साहेबांनी..ते चिन्ह आणि पक्ष शरद पावरांकडे रहायला हवं होतं. आमच्यावर जो अन्याय झाला आहे तसा अन्याय दुसऱ्या कोणावर व्हायला नको. उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील हयात असताना उत्तराधिकारी म्हणून जाहीर केले होते. लोकशाही आहे दुसऱ्यावर अन्याय करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news