

Supriya Sule Statement: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गाटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात माध्यमांना मुलाखत दिली. त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बारामती पोटनिवणूक, राहुरी पोटनिवडणूक, अजित पवार अपघात प्रकरणी एफआयआर तसेच अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी दिल्लीतील लोक माझी चेष्टा करू लागले आहेत असं वक्तव्य केलं.
सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना त्या महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी आल्या आहेत असं सांगितलं. हाच धागा पकडून त्यांनी महाराष्ट्र सरकारला हे वर्ष सामाजिक परिवर्तनासाठी द्यावं. महिला अत्याचार आणि मुलींच्या शिक्षणाासाठी द्यावं असं सांगितलं.
सुप्रिया सुळे यांनी बारामती पोट निवडणुकीबाबत देखील वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, बारामतीच्या निवणुकीत प्रचारासाठी कोणी आम्हाला आमंत्रण दिलेलं नाही. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. शरद पवारांनी देखील पहिल्याच दिवशी ही निवडणूक बिनविरोध करा अशी भूमिका गेतली होती. अजित पवार गेल्याच्या दुःखातून अजून सावरलेलो नाही. त्यामुळं सहकाऱ्याची भूमिका असावी अशी भावना होती. कालही हीच भूमिका होती अन् आजही तीच असेल.'
खासदार सुप्रिया सुळे यांनी अशोक खरात महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी देखील वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या, 'खरातनं जे काही केलं ती भयानक गोष्ट झाली. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हा मोठा धोका आहे. या खरातने आपली चेष्टा करून ठेवली आहे. दिल्लीतील लोक माझा चेष्टा करायला लागले आहेत. या सगळ्या घटनांबाबत आपण आत्मचिंतन केलं पाहिजे.'
सुळेंनी राहुरी पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसबाबतच्या भूमिकेबद्दलही वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की, याबाबत मला कोणीही विचारण्यात आलं नव्हतं. राहुरीबाबत चर्चा झाली त्यावेळी आम्ही सर्व विषय स्थानिक नेत्यांवर सोडला होता. आपण ही निवडणूक लढवली पाहिजे अशी त्यांची भावना होती. प्राजक्त तनपुरेबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्राजक्त तनपुरे हे कुटुंबीयांच्या काही गोष्टींमुळे लढले नाहीत असं सुळेंनी सांगितलं.