Supriya Sule On Satara Politics: छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेता मग मार कसला खाता... सुळे थेटच बोलल्या

Supriya Sule On Satara Politics
Supriya Sule On Satara Politicspudhari
Published on
Updated on

Supriya Sule On Satara Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसात घडलेल्या दोन मोठ्या घटनांबाबत मत व्यक्त केलं. भोंदू बाबा अशोक खरात याला लैंगिक छळ केल्याप्रकरणी झालेली अटक आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी मोठा राजकीय राडा झाला होता.

त्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना मारहाण झाल्याचा धागा पकडत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे घेता आणि मार कसले खाता असा खोचक सवाल देखील विचारला.

Supriya Sule On Satara Politics
Anil Parab vs Shinde Sena: विधान परिषदेत परब यांची शिंदे गटावर जोरदार टीका; “हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा”

मी शंभूराज यांना फोन करणार

शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन सत्ताधारी पक्षांमध्येच सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून झालेल्या राड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारणा झाल्यावर त्यांनी, 'त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. हा मोठा भाऊ आणि छोटा भाऊ याचा विषयच नाही. हा नात्याचा विषय नाही तर ही लोकशाही आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर त्याच्याविरूद्ध ताकदीनं लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय उद्या १० ठिकाणी होईल. असं करणंच चुकीच असून मी शंभू राजेंना फोन करणार आहे.'

Supriya Sule On Satara Politics
ZP Results Analysis Maharashtra: जिल्हा परिषदेत भाजपची ग्रामीण मुसंडी; कोकणात ठाकरे गटाचे गड कोसळले

आत्मचिंतन करण्याची गरज

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'जर मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांना जर धक्काबुक्की झाली असेल तर ते दोघेही कॅबिनेट मंत्री आहेत. याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. एकतर ते सरकारचे भाग आहेत. ज्या सरकारचा तुम्ही भाग आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करत आहे. हे पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रात. धाकट्या भावालाच अशी धक्काबुक्की होत असेल तर आपल्याला सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.'

Supriya Sule On Satara Politics
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी घेतली राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट

मार कसला खाताय..

महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं आहे असं विचारत सुप्रिया सुळे यांनी मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची नावे घेता आणि राजकारण करता ना मग मार काय खाताय... असा सवाल देखील केला.

Supriya Sule On Satara Politics
आणखी दोन मंत्री निशाण्यावर…शंभुराज देसाई, राठोडविरोधात ठाकरे गट आक्रमक; पुरावे देणार

याचबरोबर सुप्रिया सुळे यांना स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेस तयारी करतेय असं विचारलं असता त्यांनी काँग्रेसने आमच्यासोबत तरी याबाबत काही चर्चा केलेली नाही. मला वर्तमानपत्रातूनच ही माहिती मिळत आहे असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news