Sunil Tatkare: सुनील तटकरे यांचे शरद पवारांवर कौतुकाचे शब्द; विलीनीकरणाच्या निर्णयाकडे लक्ष

'अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहिले पाहिजे'; अजितदादांच्या अपघाताच्या आरोपांवर बोलणे टाळले
Sunil Tatkare
Sunil TatkarePudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: सत्ता असो अथवा नसो, गोविंदबाग आणि सिल्व्हर ओक ही ठिकाणे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती कशी जपावीत, हे शरद पवार यांनी नेहमीच दाखवून दिले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.

Sunil Tatkare
UPSC Mains Result 2026: UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! १३,३४३ पैकी २,५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

दिवाळी पाडव्यानिमित्त मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विलीनीकरण, राज्याचे अर्थखाते आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर भूमिका मांडली. तटकरे म्हणाले, मागील तीस वर्षांपासून दिवाळी पाडव्याला बारामतीत येत आहे.

Sunil Tatkare
Maharashtra State Drama Competition: पुण्यात रंगणार ६५ वी राज्य नाट्य स्पर्धा! २९ नाट्यसंस्थांमध्ये रंगणार अभिनयाची चुरस

या दिवशी येथे उसळणारा जनसागर अनेक वर्षांपासून पाहत आहे. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी बारामती ही पंढरीसारखी आहे. शरद पवार आणि अजितदादा यांच्याविषयी आमच्या मनात श्रद्धा आहे. त्यामुळे आज अजितदादांच्या स्मृतीस्थळी कोणतेही राजकीय वक्तव्य करायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत बोलताना त्यांनी सुनेत्रा पवाणि शरद पवार हे यासंदर्भात निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.

Sunil Tatkare
Government Technical Schools Renaming: राज्यातील ५१ शासकीय तंत्रनिकेतनांचे नामांतर; पुण्यातील संस्थांनाही नवी नावे!

सध्या नेमकी काय चर्चा सुरू आहे, याची आपल्याला माहिती नाही. मात्र, योग्य वेळी सुनेत्रावहिनी यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिले पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे. अजितदादांनी राज्याला विक्रमी अर्थसंकल्प दिले. महाराष्ट्राच्या आर्थिक जडणघडणीत त्यांच्या अर्थसंकल्पांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे अर्थखाते पक्षाला मिळालेच पाहिजे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare
Mahatma Phule Memorial Expansion: महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराला गती! ३०० कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

अजितदादांच्या अपघाताच्या आरोपांवर मौन..

अजित पवार यांच्या अपघातात आपला हात असल्याच्या आरोपांबाबत विचारले असता तटकरे यांनी थेट उत्तर देणे टाळले. अजितदादांच्या पवित्र स्मृतीस्थळी राजकीय वक्तव्य करायचे नाही, असे ते म्हणाले. मात्र, माझीही चाळीस वर्षांची तपश्चर्या आहे. अजितदादांसोबत माझे काय नाते होते, हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे, असे सांगत त्यांनी या आरोपांवर अधिक बोलणे टाळले. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, या पवित्र स्थळी त्यांचे नाव घ्यायचे नाही, असे सांगत तटकरे यांनी नाव न घेता टोला लगावला. कोणाचे नाव घेऊन या स्मृतीस्थळाचे महात्म्य कमी करायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.