Maharashtra State Drama Competition: पुण्यात रंगणार ६५ वी राज्य नाट्य स्पर्धा! २९ नाट्यसंस्थांमध्ये रंगणार अभिनयाची चुरस

१६ नोव्हेंबरपासून भरत नाट्य मंदिरात प्राथमिक फेरी; पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ६४ प्रवेशिका
Drama
DramaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ६५ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. सोमवारपासून (दि. १६ नोव्हेंबर) स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगणार असून, सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात स्पर्धा होणार आहे. सोमवारी स्वच्छंद पुणेच्या लेबल या नाटकाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होईल. दररोज दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. नाट्यरसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

Drama
Government Technical Schools Renaming: राज्यातील ५१ शासकीय तंत्रनिकेतनांचे नामांतर; पुण्यातील संस्थांनाही नवी नावे!

स्पर्धेत सोमवारी (दि. १६) लेबल, ज्याच्या त्याचा प्रश्न तर मंगळवारी (दि. १७) रेड वाईन, बुधवारी (दि.१८) परफेक्ट मिस्ट्री, निशिगंध, गुरुवारी (दि. १९) वादळवाट, अंतरातल्या अंधारात, शुक्रवारी (दि. २०) बेगम बर्वे, अपूर्णम्‌ या नाटकांचे सादरीकरण होईल. तर शनिवारी (दि. २१) उद्घाटन, प्रतिमा...एक गाणे, रविवारी (दि. २२) देवाशपथ खरे सांगेन..., आर्य चाणक्य, सोमवारी (दि.२३) कपल सिंगल आहे, मोरुची मावशी, मंगळवारी (दि. २४) पसारा, ब्लॅक बॉक्स या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

Drama
Mahatma Phule Memorial Expansion: महात्मा फुले स्मारकाच्या विस्ताराला गती! ३०० कोटींचा निधी मंजूर; भूसंपादनाचा मार्ग मोकळा

बुधवारी (दि.२५) काजळी, मुळगावकर, गुरुवारी (दि. २६) उदकशांत, सखी मंद झाल्या तारका, शुक्रवारी (दि.२७) खेळीमेळी, अनेक लग्नाची एकच गोष्ट हे नाटक सादर होतील. शनिवारी (दि. २८) मारुती कांबळेचं 'हे' झालं, कुलकर्णीचं काय झालं?, सोमवारी (दि.३०) उंबऱ्यावरचा निरोप, म का वा, मंगळवारी (दि. १ डिसेंबर) सेल्फी आणि सराईत या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.

Drama
Morgaon Mayureshwar Maha Snan: सोमवती अमावास्येला मोरगावच्या मयूरेश्वराला कऱ्हा नदीत महास्नान; तोफांची ऐतिहासिक सलामी

या स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार दिवसभरातील कामकाज सांभाळून रात्री तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे. यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने २९ नाट्यसंस्थांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचा आणि नाट्यशैलींचा अनुभव घेता येईल.

Drama
Payal Zambare Case: पायल झांबरे प्रकरणात पतीसह सासू-सासऱ्यांच्या कोठडीत वाढ; ३५ तोळे सोने जप्त

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ६४ प्रवेशिका

पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांतील नाट्यसंस्था दरवर्षी या स्पर्धेत सहभागी होतात. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ६४ प्रवेशिका यावर्षी आल्या आहेत. त्यातील काही संस्थांच्या नाटकांचे सादरीकरण पिंपरी - चिंचवड आणि काही संस्थांच्या नाटकांचे सादरीकरण पुणे केंद्रावर होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.