Sunetra Pawar: दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज : खासदार सुनेत्रा पवार

बारामतीत वाढदिवसानिमित्त तालुका पुरवणीचा प्रकाशन सोहळा; निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेचे कौतुक
दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज
दै. ‌‘पुढारी‌’च्या अंकाचे प्रकाशन करताना खासदार सुनेत्रा पवार आणि अन्यPudhari
Published on
Updated on

जळोची/काटेवाडी : दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे निष्पक्ष, निर्भीड, चौफेर बातम्यांचा खजाना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, खेळ व इतर सर्व विषयांचे अभ्यासपूर्ण लेखन आणि सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असल्याचे प्रतिपादन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी केले.(Latest Pune News)

दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज
Brick Kiln Workers Rescue Indapur: इंदापूरात 20 वीटभट्टी कामगारांची सुटका : तहसील व पोलिसांची संयुक्त कारवाई

बारामतीतील सहयोग येथील निवासस्थानी शनिवारी (दि. 18) खा. सुनेत्रा पवार वाढदिवसानिमित्त काढलेल्या तालुका पुरवणीच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी सुभाष सोमाणी, संजय भोसले, व्हीआर बॉयलरचे चेअरमन राजाराम सातपुते, संचालक विवेक सातपुते, उद्योजक राहुल वायसे, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संभाजी माने, हॉटेल राजवाडा पार्कचे आनंद सावंत, अधिराज लॉन्सचे विशाल बर्गे, संदीप फर्निचरचे संदीप पवार, पोपटराव पवार, उद्योजक शिवाजीराव काळे, छत्रपती कारखान्याचे संचालक अनिल काटे, राहुल घुले, संजय काटे, दिलीप बलवड, रोहन हगवणे, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रशांत काटे, संरपच मंदाकिनी भिसे, उद्योजक विद्याधर काटे, श्रीधर घुले, भारत जाधव, श्रीजित पवार, पोपट घुले, धीरज घुले, जितेंद्र काटे, अक्षय पवार,

दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज
Pune Ring Road: पुणे रिंगरोड होणार ‌‘ग्रीन कॉरिडॉर‌’ : सौरऊर्जेसह पाच लाख वृक्षांची लागवड

दै. ‌‘पुढारी‌’चे पत्रकार गजानन हगवणे, पत्रकार अनिल सावळे पाटील आदींची उपस्थिती होती. दै. ‌‘पुढारी‌’चे संस्थापक संपादक कै. पद्मश्री ग. गो. जाधव यांनी कोल्हापूरपासून सुरुवात करून दिली. आज महाराष्ट्र, कर्नाटक गोवा व इतर ठिकाणी दै. ‌‘पुढारी‌’ने कौतुकास्पद कामगिरी करून पत्रकारितेमधील आदर्श निर्माण केल्याचे खासदार सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व समूह संपादक योगेश जाधव यांनी काश्मीरमधील बर्फमय प्रदेशात भारतीय सैन्यासाठी बांधलेले रुग्णालय, पूरग््रास्तांना मदत व इतर सामाजिक कार्याचे कौतुक पवार यांनी केले. खा. सुनेत्रा पवार म्हणाल्या, दै. ‌‘पुढारी‌’ वृत्तपत्राने नेहमीच समाजातील सकारात्मकतेला वाव दिला आहे. ‌‘वाढदिवस शुभेच्छा पुरवणी‌’ हा उपक्रम वाचकांना त्यांच्या प्रियजनांशी भावनिक नाते जपण्याची संधी देतो.

दै. ‌‘पुढारी‌’ म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज
Jain Boarding controversy: सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या विश्वस्ताचा राजीनामा

आजच्या डिजिटल युगात देखील वृत्तपत्र माध्यम माणुसकी आणि संवादाचे बंध घट्ट करणारे आहे. वाचकांच्या भावना जपणारे वृत्तपत्र म्हणून दै. ‌‘पुढारी‌’ आपली ओळख अधिक मजबूत करीत असल्याचे खा. पवार म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news