Sunetra Pawar Emotional: संघर्षयोध्याची सहचारणी आहे, खचून जाणार नाही... सुनेत्रा पवार झाल्या भावूक

पुणे जिल्हा परिषदेतील दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे आज अमित शहा यांच्या हस्ते अनावरण झालं.
Sunetra Pawar Emotional
Sunetra Pawar Emotionalpudhari
Published on: 
Updated on: 

Sunetra Pawar Emotional: पुणे जिल्हा परिषदेत आज देशाचा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेश द्वाराला देखील अजित पवार यांचे नाव देण्यात आलं. यावेळी विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. भाषणावेळी सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला होता. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार हे संघर्ष योध्ये होते. त्यांची मी सहचारणी आहे त्यामुळं खचून जाणार नाही असं सांगितलं.

Sunetra Pawar Emotional
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर; म्हणाल्या, 'जशी वेळ येईल...'

दादांचे पुणे ZP वर विशेष प्रेम होतं

पुणे जिल्हा परिषदेतील दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद ही अजित पवार यांची आवडतीची जिल्हा परिषद होती. या जिल्हा परिषदेवर अजित पवार यांचे विशेष प्रेम होतं असं सांगत या जिल्हा परिषदेच्या यशाची यादी वाचून दाखवली. दादांच्या कामातून उभी राहिलेली पुणे जिल्हापरिषद वस्तू त्याच्या कामाची पावती देते असे देखील त्या म्हणाल्या.

Sunetra Pawar Emotional
Pune ZP Model School: ‘मॉडेल स्कूल’च्या निकृष्ट कामांवरून जिल्हा परिषदेत सत्ताधारी-विरोधक एकवटले; प्रशासनाविरोधात आंदोलन

दादांचा ग्रामीण बाज

सुनेत्रा पवार आपल्या भाषणावेळी म्हणाल्या की छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झालेला दादांचा प्रवास हा उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. मात्र त्यांनी आपला ग्रामीण बाज कधी सोडला नाही. त्यांच्याकडे काम, कष्ट करण्याची जिद्द होती. आज त्यांच्या पुतळ्याचे अमित भाईंच्या हस्ते उद्घाटन झाले. शेती, सहकार ग्रामीण विकास यासाठी ते कायम केंद्राकडे मागणी करत होते.

Sunetra Pawar Emotional
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघातासंबंधीच्‍या पोस्‍टरची चर्चा

आठवणींना उजाळा

सुनेत्रा पवार यांनी दादांच्या सहवासातून आपण बरंच काही शिकल्याचं सांगितलं. त्या म्हणाल्या, 'बाहेरून कठोर असलेले दादा झाडांवर फार प्रेम करत म्हणूच त्यांनी प्रत्येक गावात एक झाड लावले. मी दादांनंतर आता राज्याच्या अनेक गावात, शहरात दौरे केले. त्यावेळी प्रत्येकाने दादांच्या आठवणींना उजाळा दिला. काहींनी शब्दांनी दिला, काहींनी मोबाईलमधील फोटोद्वारे दिला, तर काहींनी डोळ्यातील अश्रूंनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.'

पुणे जिल्हापरिषद राज्यात प्रथम आणाण्यासाठी आता प्रयत्न करूयात दादांना हीच श्रद्धांजली ठरेल असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी आपलं भाषण संपवल. विशेष म्हणजे दादांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी जय पावर, पार्थ पवार देखील उपस्थित होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.