Sugarcane Crushing License: ऊस गाळप परवाना शुल्क कपातीला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, पूरग्रस्त मदत व ऊसतोड महामंडळ शुल्काबाबत बारामती ॲग्रोसह खासगी साखर कारखान्यांच्या याचिकेत महत्त्वपूर्ण आदेश
Sugarcane Crushing License
Sugarcane Crushing LicensePudhari
Published on
Updated on

पुणे : राज्य सरकार आणि साखर आयुक्तालयाने यंदाच्या 2025-26 च्या ऊस हंगामासाठी साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये, पूरग््रास्त मदत निधीसाठी प्रतिटन 5 रुपये आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळासाठी प्रतिटन 10 रुपये शुल्क हे उसाच्या प्रति मेट्रिक टनमागे भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने स्थगिती आदेश दिले आहेत.

Sugarcane Crushing License
APK file cyber fraud Pune: एपीके फाईलद्वारे तरुणाला 10 लाखांना गंडा

राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग््राो लिमिटेड या खासगी कारखान्यांसह अन्य कारखान्यांनी दाखल केलेल्या याचिकेत तूर्तास स्थगिती देण्यात आली असून या बाबतची पुढील सुनावणी दिनांक 14 जानेवारी रोजी ठेवली आहे. या बाबत राज्य सरकार व अन्य विरोधात बारामती ॲग््राो लिमिटेड, अथणी शुगर्स लिमिटेड, लोकमंगल ॲग््राो इंडस्ट्रीज लिमिटेड, लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज, लोकमंगल शुगर इथेनॉल आणि को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Sugarcane Crushing License
Bavdhan Gaur sighting Pune: गवा, बैल की गाय... याबाबत संभम

सर्व याचिकांमधील आव्हान समान असून त्यामध्ये दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजीच्या साखर आयुक्तांच्या आक्षेपार्ह पत्राला, दिनांक 6 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाला, साखर आयुक्तांनी जारी केलेल्या 26 ऑगस्ट 2025 रोजीच्या आदेशाला आणि 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकाला आणि साखर आयुक्तांनी जारी केलेले दिनांक 27 ऑक्टोबर 2025 चे पत्राला खंडपीठाने स्थगिती दिलेली आहे. राज्य सरकारला त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी पुरेशी संधी देऊनही, त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. या पार्श्वभूमीवर अंतरिम दिलासा म्हणून शासनाच्या संबंधित निर्णय, पत्रे, आदेशाला अंमलबजावणी आणि कार्यवाहीला स्थगिती दिल्याचे म्हटले आहे.

Sugarcane Crushing License
Pune Municipal Election: ‘भाई, दादा, अण्णां’ना न्यायालयाचा ब्रेक; निवडणुकीत बाहेर येण्याच्या प्रयत्नांना लगाम

गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ आणि पूर मदत निधीसाठी अंशदान न दिल्यामुळे याचिकाकत्र्यांना गाळप परवाना देण्यास नकार देऊ नये, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी आजपर्यंत ‌‘सीएमआरएफ‌’, ‌‘महामंडळ‌’ आणि पूर मदत निधीमध्ये दिलेले अंशदान हे निषेध नोंदवून दिले आहे आणि ते या रिट याचिकांच्या निकालाच्या अधीन असेल. याचिकाकर्त्यांचे वरिष्ठ वकिलांनी या रकमेचा उपकर पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्रांचे आरक्षण आणि गाळप व साखर पुरवठ्याचे नियमन) आदेश, 1984 च्या तरतुदींच्या विरोधात आहे. हा उपकर हा कोणत्याही वैधानिक आधाराशिवाय कार्यकारी अधिकाराचा स्पष्ट गैरवापर असल्याचे नमूद करून युक्तिवाद केला. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news