

पुणे : सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइलवर एपीके फाईल पाठवून उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तरुणाच्या मोबाईलचा ताबा ऑनलाइनरीत्या घेऊन तब्बल 10 लाख रुपये वर्ग करून घेतले आहे. ही घटना 14 ते 15 नोव्हेंबर 2025 कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे.
याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने लोहगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईलधारक व वापरकर्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुण लोहगावमध्ये राहायला असून, 14 नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठविली. संबंधित फाईल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाईलचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांच्या बँकखात्यातून तब्बल 10 लाख रुपये इतर बँक खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली आहे.