

सुभाष किवडे
पुणे: मागणी कमी असल्याने गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात किंटलमागे पंचवीस रुपयांनी घट झाली. शेंगदाणा तेलाच्या दरात १५ किलोमागे वीस रुपयांनी वाढ झाली.मात्र, उठाव कमी असल्याने सरकी, सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलाच्या दरात २० ते २५ रुपयांनी घट झाली. (Latest Pune News)
सध्या घाऊक बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असून उलाढाल मंदावली आहे. पांढऱ्या वाटाण्याच्या आयातीवर केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून तीस टक्के आयातशुल्क लागू केले आहे. पूर्वीचा माल मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने तूर्त दरावर परिणाम झालेला नाही. मात्र, आगामी काळात दरवाढीची शक्यता आहे.
खाद्यतेले उतरली
सध्या घाऊक बाजारात खाद्यतेलांस मागणी कमी आहे. यामुळे गेल्या आठवड्यात सरकी, सोयाबीन, पाम तसेच सूर्यफूल तेलाच्या दरात १५ किलो/लिटरच्या डब्यामागे २० ते २५ रुपयांनी घसरण झाली, मात्र, पावसामुळे गुजरातमधील भूईमुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे, शेंगदाणा तेलाच्या दरात डब्यामागे पंचवीस रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तूप दरही २५ रुपयांनी कमी झाले. खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
येथील घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे
साखर (प्रतिक्लिंटल) ४१५०-४१७५, पिठी साखर ४३५०-४४०० रु. खाद्य तेले (१५ किलो/लिटर): शेंगदाणा तेल २३७५-२४७५, रिफाईंड तेल २१५०-२७५०, सरकी तेल २०२५-२३७५, सोयाबीन तेल १९३०-२१५०, पामतेल १८७५-२०७५, सूर्यफूल रिफाईंड तेल २०७५-२२५०, खोबरेल तेल ६००० रु. तांदळ गुजरात उकडा ३५००-४०००, मसुरी ३५००-४०००, सोना मसूरी ४५००-५०००, एच.एम.टी, कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, ११२१-११०००-११५००, आंबेमोहोर (सुवासिक) २००००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५०००१०००, बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००० ६५००, बासमती कणी ४०००-४५००, १५०९-८५००-९५००, इंद्रायणी ५५०० ६००० रु.
गहू लोकवन नं. १४०००-४२००, लोकवन नं. २ ३६००-४००२०, नं.३ ३३००-३६००, सिहोर नं. १ ५७००-६०००, सिहोरी ३८००-४४००, मिलवर ३१०० रु. ज्वारी गावरान नं. १ ५५००-५८००, गावरान नं.२ ४८००-५०००, नं.३३५००-३८००, दूरी नं. १ ३६००-४०००, दूरी नं. २ ३२००-३५०० बाजरीः महिको नं. १ ३७०००३८००, महिको नं.२ ३३००-३५००, गावरान ३५००-३६००, हायब्रीड ३२००-३३०० रु. गूळ गूळ नं. १ ४५००-४६५०, गूळ नं.२ ४३००-४४५० गूळ नं.३४१५०-४२७५, बॉक्स पॅकिंग ४४००-५५०० रु. डाळी: तूरडाळ ९०००-११०००, रु हरभराडाळ ७२००-७३००, मूगडाळ ९०००-९७००, मसूरडाळ ७४००-७५००, मटकीडाळ ८३००-८४००, उडीदडाळ १००००-१०५०० रु. कडधान्येः- हरभरा ६५००-६६००, हुलगा ४८००-५००० चवळी ७०००-१००००, मसूर ६९००-७०००, मूग ९०००-९२००, मटकी गावरान १२०००, मटकी पॉलिश ७०००, मटकी गुजरात ६८००-७०००, मटकी राजस्थान ६८००-७०००, मटकी सेलम १५०००-१५०००, वाटाणा हिरवा १३०००-१३५००, वाटाणा पांढरा ४२००-४३००.
काबुली चणा ७५००-११००० रु. साबुदाणा : साबुदाणा नं.१ ५५००, साबुदाणा नं. २५०००, साबुदाणा नं.३ ४८०० रु. वरई भगर-९५००-१०५००, सावा भगर १०००-९५०० रु गोटा खोबरे ३२००-३४०० रु. शेंगदाणा जाडा ८५००-९५००, स्पॅनिश १०८००, घुंगरु ९५००-९८०० टीजे ८००० रु. धने :- गावरान ८०००-९०००, इंदूर ११०००-१५००० रु. पोहे मध्य प्रदेश ४९००-५१००, पेण ४६००-४८००, मध्यम पोहा ४८००-५२००, दगडी पोहा ४८००-५२००, पातळ पोहा ५६००-६२००, सुपर पोहा ५३००-५७००, भाजका पोहा ६२५-७२५, मका पोहा ६००-७२५, भाजके डाळे ३४५०-६८००-४०००, मुरमुख सुरती (९ किलोस) ५५०-५७०, भडंग ८००-१११०, घोटी ५३०-५४० रु. रवा, मैदा, आटा (५० किलोचा भाव) आटा १८००-१८५०, रवा १८५०-१९००, मैदा १८५०-१९००, बेसनः (५० किलोस) ४१००-४४०० रु, मीठ मीठ खड़े (५० किलोस) ३००, मीठ दळलेले (५० किलोस) ३५० रु. मिरचीः काश्मीरी ढब्बी २५०००-३००००, व्याडगी १७०००-२००००, लवंगी तेजा १६०००-१७०००, गुंटूर १४०००-१५०००.
नोव्हेंबरसाठी २० लाख टन कोटा जाहीर
दिवाळीनंतर साखरेला उठाव कमी आहे. यामुळे गेल्या आठवड्यात साखरेच्या दरात क्लिंटलमागे पंचवीस रुपयांनी घट झाली. शनिवारी येथील भाऊक बाजारात एस ३० साखरेचा प्रतिक्रिटलचा दर ४ हजार १५० ते ४ हजार १७५ रुपये होता. नोव्हेंबरकरिता २० लाख टनाचा कोटा जाहीर झाला असून तो अपुरा आहे. मागील वर्षी हा कोटा २२ लाख टन इतका होता. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत असून तुटवडा निर्माण होणार नाही, यामुळे अपुरा कोटधाचा घोषणेनंतरही दर स्थिर आहेत.