SPPU New Courses: पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सात नवे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू; ड्रोन, ईव्ही, रोबोटिक्सला प्राधान्य

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार डिजिटल ह्युमॅनिटीज, इलेक्ट्रिक व्हेईकल, सीएनसी, रोबोटिक्ससह आधुनिक कौशल्याधारित अभ्यासक्रमांना व्यवस्थापन परिषदेची मंजुरी
SPPU
SPPUPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, उद्योग-विद्यापीठ सहकार्य, नवीन अभ्यासक्रमांची निर्मिती आणि विद्यार्थी हिताच्या विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये सात नवीन अभ्यासक्रमांना देखील मान्यता दिली आहे. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

SPPU
Savitribai Phule Pune University Students Issues: पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या रोहित पवारांसमोर; आरोग्य केंद्र, वसतिगृह आणि मानधनावर संताप

बैठकीत मानवविज्ञान विद्याशाखेअंतर्गत 'ॲडव्हान्स्ड कोर्स इन डिजिटल ह्युमॅनिटीज अँड आर्कायव्हिंग' (४४ क्रेडिट) या नव्या पायाभूत अभ्यासक्रमास मंजुरी दिली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

SPPU
Dharmendra Pradhan Resignation Celebration: ‘नीट’ आंदोलनाने सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला; रोहित पवारांचा दावा

तसेच यांत्रिकी व मटेरियल टेक्नॉलॉजी विभागांतर्गत ड्रोन पायलटिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल रिपेअरिंग, कॅड- कॅम, थ्रीडी डिझाइन, सीएनसी, व्हीएमसी ऑपरेटर, इंडस्ट्रीयल रोबोटिक्स आदी विषयांवरील सात फाउंडेशन व ॲडव्हान्स अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये प्राप्त व्हावीत, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

SPPU
PMC Junior Engineer Promotion: हायकोर्टाच्या आदेशालाही महापालिकेची केराची टोपली; कनिष्ठ अभियंता पदोन्नतीवर अवमान याचिका

अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात बी.ई. अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली. तसेच, एमई मॅकेनिकल इंजिनीअरिंग ईव्ही टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नवीन आराखड्यास आणि अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली.

SPPU
Pune E Registration: ई-रजिस्ट्रेशनमध्ये पुण्याचा दबदबा; राज्यातील ५२ टक्के दस्त नोंदणी शहरात

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी शिक्षण अधिक लवचिक आणि बहुविषयक करण्याच्या दृष्टीने स्वायत्त बी.टेक. आणि अस्वायत्त महाविद्यालयांसाठी विविध पदवी नामांकनालाही व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. या निर्णयांमुळे उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि संशोधनकेंद्रित शिक्षणाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news