पिंपरी : महापालिका शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष नियोजन

पिंपरी : महापालिका शाळांची गुणवत्ता वाढीसाठी विशेष नियोजन

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : महापालिका शाळेतील शिक्षकांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा व कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहावे, याकरिता समुपदेशकांची मदत घेण्यात येणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
'संवाद आयुक्तांशी' या उपक्रमात आयुक्त सिंह यांनी 'कौशल्य विकास आणि शिक्षण' या विषयावर शुक्रवारी (दि.23) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला.

आयुक्त सिंह म्हणाले की, पालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. दर महिन्याला शिष्यवृत्ती कार्यशाळा घेण्यात येते. शालेय साहित्याचे डीबीटीद्वारे वितरण करण्यात येत आहे. शिक्षक भरती, कला व क्रीडा शिक्षक भरती सुरू आहे. क्युसीआयमार्फत शाळा व विद्यार्थी ग्रेडेशन देण्यात येते. एलएफई व आकांक्षा फाउंडेशनमार्फत गुणवत्तापूर्ण शिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. चिखली येथे संतपीठामार्फत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. ई-कचरा संकलन उपक्रम सुरू आहे. क्रीडा प्रबोधिनी कार्यशाळा राबविण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी योगा प्रशिक्षण, आनंदी शिक्षण, माध्यमिक शाळेत एमएस-सीआयटी प्रशिक्षण, मूल्यशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण शिक्षणाअंतर्गत प्रत्येक शाळेत वृक्षलागवड, सौरऊर्जा, रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रम घेण्यात येत आहेत. जल्लोष शिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मानधन तत्त्वावर 267 प्राथमिक, 165 माध्यमिक शिक्षकांची भरती करण्यात आली.

लाईटहाऊस योजनेअंतर्गत पिंपरी, निगडी व चिंचवड केंद्रावर 18 ते 35 वयोगटातील युवक व युवतींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. समाज विकास विभागामार्फत महिलांना विविध स्वयंरोजगार कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. तंबाखूमुक्त अभियानाअंतर्गत प्राथमिक शाळेच्या आवारात तंबाखू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news