Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; अजितदादा पॅनेलचा २१-० ने विजय

पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोर पॅनेलचा धुव्वा; सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची कसोटी यशस्वी
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

युवराज खोमणे

सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजितदादांच्या निधनानंतर प्रथमच रणांगणात आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्विवाद विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनेलने २१-० अशा फरकाने विजय मिळविला. निवडणुकीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहिली. सुरुवातीला अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केलेले बंड आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली होती. अचानक पॅनेल उभे राहिल्याने राष्ट्रवादीच्या गोटातही सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पक्षाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावत प्रचाराची दिशा बदलली आणि विजयापर्यंत मजल मारली.

Someshwar Sugar Factory
Bhimashankar Sugar Factory: भीमाशंकर साखर कारखाना जानेवारी ते मार्चदरम्यान उसाला देणार जादा दर; मार्चमध्ये प्रतिटन ३,५७३ रुपये

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पॅनेल, पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल आणि शरदचंद्र पवार पक्षाचे सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल, यांच्यात लढत झाली. युवानेते युगेंद्र पवार यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या पॅनेलचे नेतृत्व केले. मात्र, मुख्य लढत राष्ट्रवादी आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलमध्येच रंगली. अचानक निर्माण झालेल्या आव्हानानंतर राष्ट्रवादीने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यंत्रणा प्रचारात उतरवली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तळ ठोकून सभासदांपर्यंत पोहचले. गावोगावी भेटी, वैयक्तिक संपर्क, बैठका आणि प्रचार सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यात आला. स्वतः सुनेत्रा पवार यांनाही नाराज सभासद आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधावा लागला. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी प्रचारात उतरली होती. सोमेश्वर मंदिर परिसरातील प्रचार सभेत सुनेत्रा पवार यांनी सभासदांना साद घालत पॅनेलला साथ देण्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती.

Someshwar Sugar Factory
Pune Water Cut: पुण्यात दर गुरुवारी पाणीबंदी; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय

अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांच्या पॅनेलमध्ये सर्वसामान्य उमेदवारांचा समावेश असल्याने प्रचाराची प्रमुख भिस्त जगताप यांच्या वैयक्तिक संपर्कावर आणि नेतृत्वावर होती. त्यांच्या पॅनेलनेही गावोगावी प्रचार सभा आणि वैयक्तिक भेटींवर भर दिला. एकूणच, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने संघटनात्मक ताकद, वरिष्ठ नेत्यांचा सहभाग आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळविला. मात्र, या विजयाने सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला सहकारातील आगामी वाटचालीसाठी नाराजी दूर करणे, कार्यकर्त्यांमधील समन्वय वाढविणे आणि सभासदांचा विश्वास अधिक दृढ करण्याचे आव्हानही दिले आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Navratri Festival: पुण्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; देवीदर्शनासाठी मंदिरांत गर्दी, दांडिया-गरबाची धूम

‘सोमेश्वर’च्या रणांगणात बंडखोर जगतापांना धक्का

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ऐनवेळी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतून बंडखाेरी करून स्वत:चे लोकनेते अजितदादा पवार सोमेश्वर विकास पॅनेल उभे करणारे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेललाही मतदारांनी नाकारले. या निवडणुकीत जगताप यांच्या नेतृत्वाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे.

Someshwar Sugar Factory
Pune Mahalakshmi Temple: सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक श्रीसूक्त पठणाने भक्तिमय वातावरण

पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलची भिस्त प्रामुख्याने पुरंदर तालुक्यातील मतांवर होती. माजी आमदार संजय जगताप व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुदाम इंगळे, माणिकराव झेंडे त्यांच्यासोबत होते. मात्र, पुरंदमध्येही मतदारांनी त्यांच्या पॅनेलला अपेक्षित साथ दिली नाही. बारामतीसह पुरंदरमधील मतदारांनी दिलेला कौल हा जगताप यांच्या पॅनेलसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुरुषोत्तम जगताप यांनी सुमारे ३५ वर्षे कारखान्याचे संचालक म्हणून काम केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना अध्यक्षपदाची संधी दिली. त्यानंतर तब्बल १३ वर्षे ते अध्यक्ष राहिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी ऐनवेळी घेतलेली फारकत जगताप यांच्यासाठी आत्मघाती ठरली. पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या प्रमुख समर्थकांचा झालेला पराभव, यामुळे सोमेश्वरच्या सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. पराभवानंतर जगताप पुढील राजकीय निर्णय काय घेणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news