Pune Mahalakshmi Temple: सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक श्रीसूक्त पठणाने भक्तिमय वातावरण

शेकडो महिला-पुरुष भाविकांचा सहभाग; पुढारी कस्तुरी क्लबच्या शंभरहून अधिक सदस्यांनीही घेतला सहभाग
Mahalakshmi Temple Shri Sukta Chanting
Mahalakshmi Temple Shri Sukta ChantingPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: महालक्ष्मी माता की जय... चा नामघोष, शंखवादनाचा निनाद आणि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह... च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवरात्रोत्सवातील द्वितीयेची पहाट शेकडो महिला आणि पुरुष भाविकांनी सामूहिकरीत्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे मंगलमय झाली.

Mahalakshmi Temple Shri Sukta Chanting
Pune October Temperature: पुण्यात ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर; १२७ वर्षांतील तिसऱ्या सर्वोच्च तापमानाची नोंद!

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवात झालेल्या सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमाचे. या वेळी डॉ. सतीश देसाई, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

Mahalakshmi Temple Shri Sukta Chanting
Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची आघाडी; संग्राम सोरटे यांचा विजय

कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी... च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. पठणाची सुरुवात शंखनाद पथकातील वादकांच्या शंखवादनाने झाली. श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्त्व आणि महती याविषयी देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ओंकार, अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्रीसूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरीत्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

Mahalakshmi Temple Shri Sukta Chanting
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय

विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सामूहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्रीशक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात श्री महालक्ष्मी देवीची आराधना, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.

Mahalakshmi Temple Shri Sukta Chanting
Voter List Deletion Applications: मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी आता १० अर्जांची मर्यादा; ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्जांची पडताळणी कशी होणार?

श्रीसूक्त हे ऋग्वेदातील श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीस समर्पित पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि कल्याण यांचे प्रतीक असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेत श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक मंगलभावनेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

पुढारी कस्तुरी क्लबच्या सदस्यांचाही उत्स्फूर्त सहभाग

सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमात 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. क्लबच्या शंभरहून अधिक सदस्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. सोमवारी (दि. १२) नवरात्रोत्सवातील रंगपरंपरेनुसार सदस्यांनी पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. भक्तिमय वातावरणात त्यांनी सामूहिक श्रीसूक्त पठणासह आरतीतही सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news