Pune Navratri Festival: पुण्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला; देवीदर्शनासाठी मंदिरांत गर्दी, दांडिया-गरबाची धूम

दुसऱ्या माळेला भक्ती, परंपरा आणि जल्लोषाचा संगम; शहरासह उपनगरांत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
Navratri
NavratriPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: देवीच्या जयघोषाने दुमदुमणारे मंदिर परिसर, भक्तिरंगात रंगलेले भाविक, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल अन् दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी झालेली तरुणाई... अशा भक्ती, परंपरा आणि जल्लोषाच्या त्रिवेणी संगमातून सोमवारी (दि. १२) नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला शहर आणि उपनगरांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Navratri
Pune Mahalakshmi Temple: सारसबागेतील महालक्ष्मी मंदिरात सामूहिक श्रीसूक्त पठणाने भक्तिमय वातावरण

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली. देवीकडे भाविकांनी सुख-समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीची प्रार्थना केली. मंडळांच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडिया-गरबाच्या आयोजनांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

Navratri
Pune October Temperature: पुण्यात ऑक्टोबरमध्ये उन्हाचा कहर; १२७ वर्षांतील तिसऱ्या सर्वोच्च तापमानाची नोंद!

दुसऱ्या माळेला शहरातील ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), चतु:शृंगीदेवी मंदिर (सेनापती बापट रस्ता), महालक्ष्मी मंदिर (सारसबागसमोर), भवानीमाता मंदिर (भवानी पेठ), तळजाईमाता देवस्थान (तळजाई टेकडी, सहकारनगर), काळी जोगेश्वरी मंदिर (बुधवार पेठ), पिवळी जोगेश्वरी मंदिर (शुक्रवार पेठ) आणि वनदेवी मंदिर (कर्वेनगर) या मंदिरांसह शहर आणि उपनगरांतील विविध देवींच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली.

Navratri
Someshwar Sugar Factory Election Result: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची आघाडी; संग्राम सोरटे यांचा विजय

मध्यवर्ती पेठांसह खडकी, कॅम्प, औंध, छत्रपती शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर, डेक्कन परिसर, बावधन, बाणेर, कर्वेनगर, कोथरूड, वानवडी, हडपसर आदी ठिकाणी उत्सवाचा रंग अनुभवायला मिळत आहे.

Navratri
Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: निंबूत-खंडाळा गटात अजितदादा पवार पॅनलचा विजय

दांडिया-गरबाच्या कार्यक्रमात तरुणाईचा सहभाग

नवरात्रोत्सव म्हटले की, गरबा आणि दांडियाची धूम आलीच. शहरातील विविध भागांमध्ये दांडिया-गरबाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. पारंपरिक गरब्यासोबतच हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर रंगणाऱ्या दांडिया नाइट्सचेही आकर्षण वाढले आहे. गृहनिर्माण सोसायट्या, सांस्कृतिक संस्था आणि विविध आयोजकांकडून नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम आयोजित केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news