Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगतापांना धक्का; अजित पवारांचे नाव-फोटो वापरण्यास मनाई

जय पवारांच्या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश; फ्लेक्स, बॅनर, पोस्टर्ससह डिजिटल प्रचार साहित्य हटविण्याचे निर्देश
Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

बारामती: श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी जोरदार धक्का दिला आहे. अजितदादा यांचे पुत्र जय पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून अजितदादा यांचे नाव व छायाचित्र वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी हे आदेश काढले.

Someshwar Sugar Factory
Government Hospital Medicine Quality: सरकारी रुग्णालयांतील औषधांवर ‘औषध शोधक’ची नजर; बनावट-निकृष्ट औषधे रोखण्यासाठी विशेष पथक

जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल निवडणूक लढवत आहे. अजितदादा पवार यांच्या कुटुंबियांच्या मान्यतेशिवाय कोणीही अजितदादा यांचे छायाचित्र अथवा नाव वापरू नये, असे पत्रक राष्ट्रवादीने प्रसिद्धीला दिले होते. त्यानंतरही जगताप यांनी पॅनेलच्या नावात बदल केला नाही. शिवाय प्रचार साहित्यावरही अजितदादांचे छायाचित्र ठेवले. त्यानंतर जय पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे धाव घेत हरकत अर्ज दाखल केला.

Someshwar Sugar Factory
Pune Footpath Encroachment: पुणे महापालिकेविरोधात अवमान याचिका; फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही?

त्यानुसार अजितदादा पवार अथवा अजित पवार या नावाचा, त्यांच्या प्रतिमेचा वापर असलेले फ्लेक्स, बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स, पत्रके तसेच अन्य मुद्रीत, इलेक्ट्राॅनिक किंवा डिजिटल प्रचार साहित्याचा तात्काळ वापर थांबवत हे साहित्य काढून घेण्याचे आदेश आहेर यांनी दिले आहेत.

Someshwar Sugar Factory
Shirur NCP Organization: शिरूरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीची संघटना सुस्त; पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ही कार्यवाही पूर्ण करत त्याचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करावा लागणार आहे. हे साहित्य काढून न घेतल्यास किंवा नावाचा वापर न थांबविल्यास फौजदारी कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

logo
Pudhari News
pudhari.news