

वेल्हे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत पुणे जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने मंजूर केलेल्या हायमास्ट सौरदिवे प्रकल्पात मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. वेल्हे बुद्रुकसह राजगड तालुक्यातील काही गावांमध्ये हे दिवे प्रत्यक्षात न बसवता बोगस कागदपत्रे व जीओ-टॅग फोटोंच्या आधारे लाखो रुपयांची बिले मंजूर झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वेल्हे बुद्रुकप्रमाणे पानशेत, कुरण खुर्द, घिसर, करंजावणे, केळद या गावांतही बोगस कागदपत्रांच्या आधारे बिले मंजूर केली आहेत. संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.
आनंद देशमाने, माजी जि. प. सदस्य
या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सरपंच सीता खुळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या घटनेमुळे पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग््राामपंचायतीच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.
बिलासाठी जोडलेले ग््राामपंचायतीचे पत्र बोगस आहे. माझ्या नावाचा आणि सहीचा गैरवापर करण्यात आला आहे. पत्रावर ना ग््राामपंचायतीचे लेटरहेड, ना योग्य पदनाम. हे पत्र पूर्णपणे बोगस आहे.
अजित कांबळे, तत्कालीन ग््राामविकास अधिकारी
2024-25 या आर्थिक वर्षात वेल्हे बुद्रुकमध्ये दोन हायमास्ट सौरदिव्यांचे काम मंजूर झाले. सहा महिन्यांपूर्वी ठेकेदाराने हे साहित्य ग््राामपंचायत आवारात ठेवले मात्र दिवे उभारण्यातच आले नाहीत. तरीही भोसरीतील जी. के. एजन्सी या ठेकेदाराने बोगस जीओ-टॅग फोटो आणि ग््राामसेवकाच्या बनावट सहीच्या आधारे बिल मंजूर करून घेतल्याचे समोर आले. दाखवलेले फोटो वेल्हेचे नसल्याचे देशमाने, सरपंच खुळे व गावकऱ्यांनी त्वरित ओळखले. तसेच तत्कालीन ग््राामविकास अधिकारी अजित कांबळे यांच्या बनावट सहीचे पत्र जोडल्याचेही उघड झाले.
हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासक असल्याने सरपंचाच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे ठेकेदार बोगस कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांचा अपहार करत आहेत. बनावट कागदपत्रांवर बिले मंजूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.
सीता खुळे, सरपंच
साहित्य धूळ खात; काही चोरीलाही गेले
ग््राामपंचायत आवारात पडलेले सौरदिव्यांचे महागडे साहित्य धूळ खात असून, काही साहित्य चोरीलाही गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग््राामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची पाहणी करताना सध्याचे ग््राामविकास अधिकारी नवनाथ दणाणे, सरपंच सीता खुळे, माजी सरपंच संदीप नगिने आदी उपस्थित होते.
याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. दोषी ठेकेदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
संजय ढमाळ, गटविकास अधिकारी, राजगड तालुका पंचायत समिती