PMPML Land Requirement: पीएमपीएमलसमोर ‘जागे’ चा पेच! 2,000 नव्या बस येणार; 120 एकर कुठून आणणार?

पुणे-पिंपरी आणि पीएमआरडीएमध्ये धडाकेबाज शोधमोहीम; विकास आराखड्यातील जागांवर डोळा
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

प्रसाद जगताप

पुणे: पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात दोन हजार गाड्या येणार आहेत, त्या गाड्या पार्क कुठे करायच्या? असा प्रश्न पीएमपीला पडलेला आहे. बसगाड्या पार्किंग आणि संचलनासाठी तब्बल 120 एकर जागेची आवश्यकता असून, त्यासाठी पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात जोरदार शोध मोहीम सुरू झाली आहे.

PMPML
Pune School Vehicle RTO Action: पुण्यात शालेय वाहनांवर मोठी धडक! 249 बस-व्हॅनना दणका, 22 लाखांचा दंड

पीएमपीच्या ताफ्यात सध्या 2001 गाड्या आहेत, आगामी काळात स्व:मालकीच्या आणि केंद्रशासनाच्या पीएमईड्राईव्ह योजनेमधून दोन हजार नव्या बस दाखल होणार आहेत. यामुळे एकूण चार हजार बस आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात असणार आहेत. मात्र, ताफ्यातील अगोदरच्याच बस पार्कींगसाठी जागा अपुरी असताना नवीन बस आल्यावर त्या पार्कींग आणि त्यांच्या संचलनाच्या नियोजनासाठी जागा कोठून आणायची, असा प्रश्न पीएमपी प्रशासनासमोर आहे.

PMPML
Khurpudi Khandoba Temple Theft: खरपुडी खंडोबा मंदिरात मोठा धक्का! ४० लाखांचा ऐवज लुटला

अशी केली जागांची मागणी

  • पुणे महानगरपालिका हद्दीत - 24 जागांची मागणी

  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत - 10 जागांची मागणी

  • पीएमआरडीए हद्दीत - 3 जागांची मागणी

PMPML
Pune Municipal Employees Heart Attack: मनपात धक्कादायक दिवस! दोन कर्मचाऱ्यांना हार्ट अटॅक; डॉक्टर नसल्याने एकाचा मृत्यू

विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध सुरू

पीएमपी प्रशासनाला नव्या बस पार्कींगसाठी जागांची आवश्यकता आहे. त्याचा शोध पीएमपीकडून सुरू झाला आहे. विकास आराखड्यातील आरक्षित जागांचा शोध प्रशासनाने घेतला असून, त्या पीएमपी प्रशासनाला मिळाव्यात, यासाठीचा प्रस्ताव तयार करून, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए प्रशासनाला देण्यात आला आहे. संबंधित प्रशासनाकडून पीएमपीला जागा देण्याबाबत कसा प्रस्ताव मिळतो, हे पहावे लागणार आहे.

PMPML
Pune Municipal Employees Heart Attack: मनपात धक्कादायक दिवस! दोन कर्मचाऱ्यांना हार्ट अटॅक; डॉक्टर नसल्याने एकाचा मृत्यू

पीएमपीच्या ताफ्यात आगामी काळात दोन हजार नव्या गाड्या येणार आहेत. या दोन हजार बसगाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील. त्या गाड्यांसाठी आम्हाला 120 एकर जागा आवश्यक आहे. विकास आराखड्यातील जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीएला केली आहे.

पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news