Sugar Factory Loan Investigation: सहा साखर कारखान्यांच्या ५६४ कोटींच्या कर्जाची फेरतपासणी; मातब्बर नेत्यांशी संबंधित कारखाने रडारवर

हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, महाडिक, दानवे यांच्याशी संबंधित कारखान्यांचा समावेश
Sugar Factory
Sugar FactoryPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळांकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र शासनामार्फत खेळत्या भांडवलासाठी व भांडवली खर्चासाठी कर्ज रक्कम दिलेल्या सहा साखर कारखान्यांच्या तपासणीच्या सूचना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिल्या आहेत. या सर्व कारखान्यांना मिळून एकूण ५६४ कोटी ५४ लाखांचे कर्ज दिलेले आहे. कर्जाच्या विनियोग व परतफेडीची ही तपासणी महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण ज्या कारणांसाठी कर्ज दिले, त्याचसाठी वापर होणे आवश्यक असून, तसे नसल्यास कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sugar Factory
Pune MPSC Student Protest: पुण्यात MPSC आंदोलनाला तिसरी फूट; ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्हवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

एनसीडीसीकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहा सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरित करण्यास दि. ३ ऑगस्ट २०२३ आणि दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयाअन्वये मान्यता देण्यात आली आहे. या सहकारी साखर कारखान्यांना वितरित केलेल्या कर्जाचे विनियोग आणि परतफेडीबाबत तपासणी करण्यासाठी साखर आयुक्तालयातून अधिकारी संबंधित सहकारी साखर कारखान्यांना भेट देणार आहेत.

Sugar Factory
Pune District Bank Election: शिरूरमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली; १३१ ठरावांमुळे इच्छुकांची संख्या वाढली

कर्जाच्या विनियोगाची फेरतपासणी करणाऱ्या विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था (साखर) यांनी व्यक्तिशः उपस्थित राहण्याबाबतच्या सूचनाही प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या स्तरावरून निर्गमित करण्याबाबत साखर आयुक्तांनी पुणे, सोलापूर, कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथील साखर सहसंचालकांना कळवले आहे. संबंधित सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक आणि या विषयाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sugar Factory
Maharashtra Integrated Assessment Test: दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये संकलित मूल्यमापन चाचणी

वितरित कर्जाच्या विनियोग व परतफेडीतील तपासणीचे कारखाने (रक्कम कोटीत)

  • कर्मयोगी शंकरराव पाटील, पुणे : १५०=०० : २८-९-२०२६

  • निरा-भीमा, पुणे : ७५=०० : २८-९-२०२६

  • शंकर सहकारी साखर, सोलापूर : ११३=४२ : २३-९-२०२६

  • भीमा सहकारी, सोलापूर : १२६=३८ : २४-९-२०२६

  • श्री रामेश्वर सहकारी, जालना : ३४=७४ : १-१०-२०२६

  • विश्वासराव नाईक सहकारी, सांगली : ६५=०० : २९-९-२०२६

  • एकूण : ५६४=५४ कोटी

Sugar Factory
Rajgad Rice Crop Damage: राजगडमध्ये कडक उन्हाचा भात पिकाला फटका; शेकडो हेक्टर शेती करपली

हर्षवर्धन पाटलांसह या मात्तबर नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश

पुणे जिल्ह्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील अध्यक्ष असलेल्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना आणि निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या दोन्ही कारखान्यांना मिळून २२५ कोटींचे कर्ज रक्कम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांची तपासणी होणार आहे. त्यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. तसेच, भाजपचे खासदार धनंजय महाडिक व विश्वराज महाडिक यांच्यांशी संबंधित भीमा सहकारी (टाकळी सिकंदर) साखर कारखान्यांचाही समावेश आहे. जालना जिल्ह्यातील श्री रामेश्वर सहकारी साखर कारखाना हा माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यांशी संबंधित आहे. तर सांगली जिल्ह्यातील विश्वासराव नाईक सहकारी हा मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली चालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news